ज्योती राक्षेला डॉ. शर्मा सुवर्णपदक

अकोले – येथील अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थिनी ज्योती बाळासाहेब राक्षे हिला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अर्थशास्त्र विषयातील दी प्रेसिडेंट ऑफ इंडिया डॉ. शंकरदयाळ शर्मा सुवर्णपदक जाहीर झाले आहे. याबाबत महाविद्यालयास नुकतेच पत्र प्राप्त झाले असल्याची माहिती

प्राचार्य डॉ. भास्कर शेळके यांनी दिली. तालुक्‍यातील उंचखडक खुर्द येथील शेतकरी कुटुंबातील ज्योतीने 2018-19 मध्ये तृतीय वर्ष कला परीक्षेत अर्थशास्त्र या विषयात 78 टक्के गुण मिळवून महाविद्यालयातच नव्हे, तर विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

अर्थशास्त्र विभागातील प्रा. विश्‍वनाथ कोटकर, प्रा. डॉ. सुनील मोहटे यांचे तिला मार्गदर्शन लाभले. तिचे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्‍वस्त माजी मंत्री मधुकरराव पिचड, आ. वैभवराव पिचड, संस्थेचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, उपाध्यक्ष मधुकरराव सोनवणे, सचिव यशवंतराव आभाळे, सहसचिव भाऊसाहेब गोडसे, खजिनदार एस. पी. देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)