गोवर, रुबेला जनजागृतीसाठी शहरातून जनजागृती फेरी

कोपरगाव  – गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेस कोपरगाव नगरपालिका, नगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्र, शिक्षण मंडळ व संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडिअम स्कूलच्या संयुक्तविद्यमाने शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली.
या प्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या हस्ते फेरीस प्रारंभ करण्यात आला.

यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कुंदन गायकवाड, को. न. पा. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. गायत्री कांडेकर, संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडिअमचे कार्यकारी संचालक विशाल झावरे, सदस्य विक्रांत झावरे, को. न. पा. शिक्षण मंडळाचे प्रशांत शिंदे, अमित पराई, आशा कर्मचारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक तसेच विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

-Ads-

प्रभातफेरीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हातात विविध घोषवाक्‍य लिहिलेले फलक होते. शिक्षकांनी तसेच आरोग्य केंद्रातील सेविकांनी शहरातील नागरिकांना, प्रवाशांना गोवर व रुबेला लसीकरणाचे माहिती पत्रके देऊन जनजागृती केली. सदर प्रभात फेरीचा समारोप संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडिअम स्कूलच्या प्रांगणात छोटेखानी कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना तसेच परीसरातील नागरिकांना प्रबोधनपर मार्गदर्शन करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)