अवैध धंद्यांवर छापे टाकून 54 जणांना अटक

86 हजारांचा मुद्देमाल जप्त

या मोहिमेत आज सायंकाळपर्यंत दारूबंदी कायद्याखाली एकूण 13 गुन्हे दाखल करुन 6 हजार 238 रुपये किमतीची दारू जप्त केली. तसेच 22 हजार रुपयांचे रसायन नष्ट केले. 11 जुगार अड्यांवर छापे टाकून 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 54 आरोपींना अटक करण्यात आली.

शेवगाव – गावठी दारूच्या भट्ट्या, जुगार, फरार आरोपी पकडण्याची विशेष मोहीम शेवगाव पोलीसांनी हाती घेतली आहे. आता पर्यंत 54 आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

तालुक्‍यातील आव्हाणे व चापडगाव येथे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व उपनिरीक्षक भारत काळे यांच्या पथकांनी छापे टाकून गावठी दारू हातभट्ट्या उद्‌ध्वस्त करुन दारू तयार करण्याचे साहित्य जप्त केले आहे. यामध्ये सहा आरोपींना अटक करुन 22 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच देवटाकळी, आव्हाणे, भातकुडगाव, अमरापूर, नवीन दहिफळ, मुर्शतपूर, सोनेसांगवी, बोधेगाव या ठिकाणी दहा अवैध दारू अड्ड्यांवर छापे टाकून दहा जणांना अटक केली आहे. या कारवाईत 6 हजार 500 रुपयांच्या दारू बाटल्या जप्त केल्या आहेत.

-Ads-

दुष्काळी स्थिती असली, तरी जुगार अड्ड्यांना सुकाळ आलेला आहे. तालुक्‍यात अकरा गावांमध्ये छापे टाकून 38 जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या छाप्यांमध्ये 80 हजार रुपयांचे जुगार साहित्य व रोख रक्कम पोलिसांच्या हाती लागली आहे. बोधेगाव, दहिगावशे, शहरटाकळी, चापडगाव, घोटण, एरंडगाव, देवटाकळी, मुंगी आदी गावांतील जुगार अड्ड्यांवर छापे टाकले आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, उपनिरीक्षक भारत काळे, स. फौ. भाऊसाहेब गिरी, पो. कॉ. बाळासाहेब ताके, संतोष धोत्रे, बबनराव राठोड, संजय बडे सुधाकर दराडे आदी या मोहिमेत सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)