बनावट दाखल्याच्या आधारे नोकरी, चौघांविरोधात गुन्हा

दलालांचा “प्रताप’?

हा बनावट दाखला मिळवून देण्यासाठी मधुकर तोरडमल याला दलालांनी मदत केल्याची माहिती समोर येत आहे. कोतवाली पोलीस त्यानुसार तपास करून त्यामागील सत्य समोर आणतील, अशी अपेक्षा महसूलचे अधिकारी व्यक्त करत आहेत. महसूलच्या या पावित्र्यामुळे दलालांना पुन्हा दणका बसला आहे.

नगर – भूसंपादनाचा बनावट दाखला घेत ठाणे पोलीस दलात नोकरी मिळविणारा आणि त्याला मदत करणाऱ्यांविरोधात महसूल विभागाने आज गुन्हा नोंदविला. सुरेश विठोबा तोरडमल, मधुकर भास्कर तोरडमल, किरण सुरेश तोरडमल व अमोल मधुकर तोरडमल (सर्व रा. बारदरी, ता. नगर) या चौघांविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. मंडलाधिकारी राधाबाई वैभव ससाणे यांनी कोतवाली पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पुर्नवसन शाखेकडे हे प्रकरण पडताळणीसाठी आले, असता वरील बनावट प्रकार समोर आला. नगर तालुक्‍यातील जांब येथील गट नंबर 223 क्षेत्रातील एक हेक्‍टरचे 27 आर, ही जमीन 1 जुलै 2012 मध्ये पाझर तलावासाठी महसूलने संपादीत केली होती. या संपादीत जमिनीपोटी सुरेश विठोबा तोरडमल व मधुकर भास्कर तोरडमल यांनी हा बनावट दाखला घेतला होता. या दाखल्याची अभिलेखाची पडताळणी करताना तो बनावट असल्याचे लक्षात आले. हा दाखला जांब (ता. नगर) येथील संपादीत केलेल्या जमिनीचा नाही. त्यावरील शिक्का हा भूसंपादन कार्यालयाशी मिळताजुळता आहे. परंतु तो बनावट असून, कार्यालयाच्या शिक्‍क्‍यासारखा नाही.

तीन दिवसानंतर गुन्हा

महसूल विभागाच्या महिला अधिकारी गुन्हा दाखल करण्यासाठी तीन दिवसांपासून कोतवाली पोलीस ठाण्यात येत होत्या. पोलिसांनी सुरूवातीला दाद दिली नाही. उपजिल्हाधिकारी शाहूराव मोरे यांनी पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांना संपर्क साधल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.

-Ads-

लक्ष्मण कोंडिबा काळे यांना 2 मार्च 2012 मध्ये संपादीत जमिनीचा दाखला दिलेला आहे. तोरडमल याने मिळविलेला दाखल्यावर रविवारची तारीख आहे आणि त्यादिवशी कार्यालयाला सुट्टी असते. त्यावरून हा दाखला बनावट असल्यावर शिक्कमोर्तब होते. तोरडमलच्या प्रतिज्ञापत्राची चौकशीही महसूल अधिकाऱ्यांनी केली. सरकारी योजनेसाठी बनावट दाखला तयार केल्याचे त्यात समोर आले.

भास्कर तोरडमल यांचा मुलगा अमोल याने या बनावट दाखल्यावर सरकारी नोकरीचा लाभ घेतला आहे. किरण सुरेश तोरडमल याने तर ठाणे शहर पोलीस दलामध्ये आरक्षणातंर्गत पोलीस शिपाई या पदावर निवड झाली आहे. किरण याने यासाठी या बनावट दाखल्याचा वापर केला आहे. मंडलाधिकारी ससाणे यांनी बनावट दाखल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून, त्यानुसार तपास सुरू झाला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)