माहीजळगावला सर्व रोगनिदान शिबीर

कर्जत – तालुक्‍यातील माहीजळगाव येथील स्वामी समर्थ सेवा केंद्रात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर संचलित सद्‌गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल व मेडिकल ट्रस्टतर्फे मोफत आरोग्य तपासणी, नाडी परीक्षण व सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास माहीजळगावसह परिसरातील रुग्णांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

तालुक्‍यातील माहीजळगाव येथे काळ भैरवनाथ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे. तेथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सुरु असलेल्या या शिबिरात तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार, मधुमेह सर्व प्रकारचे कॅन्सर, रक्तदाब, सांध्यांचे विकार, वात विकार, लहान मुलांचे विकार, मनोरुग्ण व विकार या वर मोफत तपासणी व रोगनिदान करण्यात आले. सलग पाच दिवस चाललेल्या या शिबिरास हजारो रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली, यामध्ये महिलांचा विशेष सहभाग होता.

-Ads-

शिबीर यशस्वीतेसाठी युवा नेते केशव घोडके, डॉ. दत्तात्रय कदम, उद्योजक नीलेश शेवाळे, पांडुरंग शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य खंडेराव गायकवाड, बबन खामकर, सचीन शिंदे, नवनाथ कुरुळे, डॉ. अविनाश कदम, आजिनाथ कदम व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)