नगर – जिल्हा परिषद महिला परिचरांच्या मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत.शासनाकडून बैठकांमध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तत होत नाही. त्यामुळे आता जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाने दि. 28 नोव्हेंबरपासून मुंबईला विधीमंडळासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात नगर जिल्हा परिषदेतील महिला परिचर सहभागी होणार असल्याची माहिती महासंघाच्या जिल्हाध्यक्ष कल्पना महाडिक व सचिव मंगल उगले यांनी दिली.
महिला परिचरांना नियमित सेवेत घ्यावे, गरजेवर आधारित किमान वेतन 10 हजार रुपये प्रतिमहिना मिळावे, लसीकरण सत्राचे परिश्रमिक मिळावे, शस्त्रक्रिया शिबिरास रात्रपाळी लावणे बंद करावे, गणवेश व ओळखपत्र मिळावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. अर्धवेळ स्त्री परिचर यांना किमान वेतन सहा हजार रुपये मिळावे.
याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाने आरोग्य भागाला परत पाठवला आहे. वित्त विभागाने आरोग्य विभागाकडून प्रस्ताव मागवून मंजुरी द्यावी, अशी मागणी महिला परिचर संघटनेने केली आहे. संघटनेचे सर्व प्रश्न मागण्यांना घेवून सरकारला धारेवर धरण्यासाठी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनात महिला परिचरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महासंघाच्या कार्याध्यक्ष लता कांबळे, कल्पना धनवटे, मंगल वारे, सुनिता गागरे आदींनी केले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा