श्रीगोंद्यातून भरदिवसा आठ शेळ्या चोरीला

शेळ्या चोरांचे रॅकेट पुन्हा सक्रिय

श्रीगोंद्यात चारचाकी वाहनातून शेळ्या चोरीच्या घटना यापूर्वी अनेकवेळा घडल्या आहेत. भैरवनाथ गल्लीतून दोन शेळ्या यापूर्वी अशाच पद्धतीने गेल्या होत्या. त्याचबरोबर बाजार तळातून देखील अशाच तऱ्हेने शेळ्यांची चोरी झाली होती. श्रीगोंदा पोलिसांनी एकदा शेळ्या चोरून नेणारा पिकअप चिखली घाटात पकडला होता. शेळ्या चोरीचे रॅकेट पुन्हा सक्रिय झाले आहे. त्यामुळे चोरांचा पर्दाफाश पोलीस करतील का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

श्रीगोंदे – श्रीगोंदा शहरातील बाजार तळ येथील संस्कृती कलेक्‍शन समोरील रहदारीच्या रस्त्यावर फिरत असलेल्या आठ शेळ्यांची चोरी झाली आहे. शनिवारी सकाळी 8 वाजता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी चारचाकी गाडीत या शेळ्या डांबून लंपास केल्या.

श्रीगोंद्यातील बाजार तळ परिसरातील बहुतांश नागरिक शेळीपालन करतात. या शेळ्या बाजार तळ परिसरात चरत असतात. आज (दि. 24) सकाळी 8 वाजता नेहमीप्रमाणे शेळ्या रस्त्यालगत फिरत होत्या. सांस्कृती कलेक्‍शन जवळ असलेल्या या शेळ्यांवर एका चारचाकी गाडीत असलेल्या अज्ञातांनी पाळत ठेवली. त्यांना चाऱ्याचे आमिष दाखवून गाडी जवळ आणले. नंतर काही क्षणात या शेळ्या गाडीत टाकून धूम ठोकली.

-Ads-

हा प्रकार परिसरातील एका तरुणाने पाहिल्यानंतर त्याने घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वीच गाडीतील चोरट्यानी आठ शेळ्या घेऊन नगर रस्त्याच्या दिशने धूम ठोकली. यामध्ये ननवरे परिवाराच्या 7 शेळ्या, तर समीर जमादार यांची एक शेळी चोरीला गेली. ननवरे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)