हिंदूराष्ट्र सेनेच्या खराडेला केडगावातून अटक

नगर – शहरातील गंजबाजार येथील सराफ कारागीराचे दहा तोळे सोने लुटीतील मुख्य आरोपी हिंदू राष्ट्रसेनेचा कार्यकर्ता परेश चंद्रकांत खराडे (रा. दातरंगे मळा, नालेगाव) याला केडगावात कोतवाली पोलिसांच्या पथकाने सापळा रचून जेरबंद गेले. त्याने गुन्ह्याची कबूली दिली असुन, न्यायालयाने त्यास सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तो मागील दोन महिन्यांपासून पसार होता.

28 ऑक्‍टोबर 2018 ला गंजबाजार येथे संजीत माणिक मंडल यांच्याकडील दहा तोळे सोने चार जणांनी हिसकावून नेले होते, याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सचिन सुभाष वाळके (रा. टांगेगल्ली, नालेगाव), कमलेश राजेंद्र नवले (रा. कुंभारगल्ली), अक्षय बाबासाहेब दातरंगे (रा. सातपुते तालीम, नालेगाव) या तीघांना अटक केली होती.

-Ads-

परेश खराडे हा या गुन्ह्याचा मोरख्या होता. काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीचा विनयभंगाच्या गुन्ह्यात त्यास अटक केली होती. या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंरतर त्याने दरोडा टाकला होता.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)