बुऱ्हाणनगर चोरीची माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस

नगर – बुऱ्हाणनगर येथील देवी मंदिरात झालेल्या चोरीचा तपास अद्याप सुरुच असून पोलीस अजूनही तपास लावण्यास अपयशी ठरले आहे. चोरीच्या या घटनेबाबत माहिती देण्यास पोलीस प्रशासनाच्या वतीने एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार असून माहिती देणाऱ्याचे गुप्त राखले जाईल, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.

बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी मंदिरात शनिवारी (दि.17) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरांनी मंदिराचा दरवाजा व जाळीचे दरवाजाची कडी कोयंडा तोडून, कटरने कापून आत प्रवेश केला. आतील गाभाऱ्यात जाऊन देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने व दानपेटीतील 25 हजार रुपये चोरुन नेले. चोरांचे हे कृत्य मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले.

-Ads-

चोरटे पाच असून ते मोटारसायकलवरुन आल्याचे कॅमेऱ्यात दिसले. यावरुन कॅम्प पोलिसांनी कसून तपास सुरु केला. परंतू पोलिसांना अद्याप कसलाच पुरावा किंवा माहिती मिळाली नसल्याने पोलीस या चोरीच्या तपासाबाबत अंधारातच चाचपडत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरुन पोलिसांनी आरोपीचे रेखाचित्र काढून सर्व पोलीस ठाण्यासह सोशल मीडियावरुन प्रसिध्द केले आणि नागरिकांना माहिती असल्यास त्यांनी माहिती द्यावी असे आवाहन केले.

पोलिसांच्या या प्रयत्नास यश आले नाही. म्हणून मंदिराचे पुरोहित व पोलीस प्रशासन यांनी चोराविषयी माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपये बक्षीस देण्याचे जाहीर केले. तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)