कुकाण्यात हजरत मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात

कुकाणे – इस्लाम धर्माचे प्रेषित व संपुर्ण विश्वाला शांतता, समता, बंधुता आणि प्रेमाचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन ( ईद – ए -मिला दुन्नबी) कुकाणे (ता. नेवासे ) येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाने जामा मज्जीद येथुन सवाद्य मिरवणुक काढण्यात आली.

ही मिरवणुक बाजार तळ, बस थांबा परिसर व शेवगाव- नेवासा या महामार्गाने जाऊन येथील न्यामत शहावली बाबाचां दर्गा परिसरात मिरवणुकीची सांगता करण्यात आली.न्यामत शहावली बाबांच्या समाधीस पुष्पांची चादर अर्पण करून अभिवादन केले. तर मौलाना शमशाद पठाण यांनी प्रार्थना करून हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीचे महत्व विशद केले.

-Ads-

यावेळी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, मुस्लीम समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हमीदभाई नालबंद, बालमभाई शेख, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष शाम ढोकणे, शालेय समिती अध्यक्ष कैलास म्हस्के हे उपस्थित होते. प्रा. रज्जाक इनामदार यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी मिठाई व प्रसादाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी आकील तांबोळी, राजु शेख, जावेद तांबोळी, राजु नालबंद, ताजमहम्मद तांबोळी, जावेद शेख, आरीफ नालबंद, समीर शेख, आयुब नालबंद, इम्रान शेख, सलाम नालबंद, वाशिम तांबोळी, सुलतान पटेल, हाबिब शेख, शाकीर नालबंद, सलिम शेख, मुन्ना इनामदार, तय्युब शेख, जाकिर शहा आदिंनी विशेष परिश्रम घेतले. अध्यक्ष प्रा. रज्जाक इनामदार यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)