आढळगाव ते तांदळी दुमाला रस्ता दुरुस्तीची मागणी

श्रीगोंदे – तालुक्‍यातील आढळगाव ते तांदळी दुमाला रस्त्याची दुरावस्था झाली असून, तो तत्काळ दुरुस्त न केल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा बळीराम बोडखे आणि राजेंद्र भोस यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत तहसीलदार महेंद्र माळी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आढळगाव तांदळी दुमाला आणि टाकळी लोणार रोड अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याच्या साईडपट्ट्या उखडल्या आहेत तर, रोडवर मोठे खड्डे पडले असल्याने येथे अनेक अपघात झाले आहेत. या रस्त्यावरून मोठी वाहतूक होत आहे.

-Ads-

या भागात उसाचे प्रमाण अधिक असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच तालुक्‍याच्या ठिकाणी ये-जा करताना खराब रस्त्यामुळे प्रवाशांची मोठी कुचंबना होत आहे.

सदर रस्त्याचे काम तातडीने दुरुस्त न केल्यास 3 डिसेंबरला तहसील कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा बोडखे आणि भोस यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)