भविष्य निर्वाह निधी आयुक्तांना दहा हजारांचा दंड

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नगर – भविष्य निर्वाह निधीचे विभागीय आयुक्त यांना दहा हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे. मंचाचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी, सदस्य चारुशीला डोंगरे व महेश ढाके यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून, यामुळे पेन्शनधारकांना त्यांच्या तक्रारी निकाली निघण्याची आशा निर्माण झाली आहे.

आष्टी तालुक्‍यातील रामदास रंगनाथ सोले हे, राशीन येथील जगदंबा सहकारी साखर कारखाना यांच्याकडे नोकरीस होते, दरम्यान त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला व पेन्शन मिळण्यासाठी प्रस्ताव भविष्य निर्वाह निधीचे नाशिक येथील कार्यालयाला पाठविला. मात्र, सोले यांनी नोकरीच्या कालावधीत दहा वर्षापेक्षा कमी प्रॉव्हिडंट फंडाची कपात झाल्याचे कारण पुढे करुन त्यांना पेन्शन देण्याचे नाकारण्यात आले.

पेन्शन सुरू होण्यासाठी त्यांनी ग्राहक मंचात धाव घेतली व भविष्यनिर्वाह निधी विभाग तसेच जगदंबा साखर कारखाना यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यांच्या गुणदोषांवर निकाल होऊन डिसेंबर 2006 मध्ये नगरच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने त्यांची तक्रार मंजूर करून, सोले यांना भविष्य निर्वाह निधी विभागाने एम्पलॉइज पेन्शन स्कीमचे कलम 12 नुसार 1 मे 1998 पासून पेन्शन द्यावी. तसेच दोन तारखेपासून सहा टक्के दराने व्याजदरासह मानसिक त्रास व खर्चापोटी रक्कम देण्याचे आदेश दिले. भविष्य निर्वाह निधी खात्याने आदेशाची पूर्तता न करता औरंगाबाद येथील राज्य ग्राहक आयोगाचे खंडपीठ यांच्यासमोर याचिका दाखल केली.

सदरची अपील स्पष्टपणे 2011 मध्ये रद्द होऊनदेखील वरील आदेशाची पूर्तता करण्यात आली नाही, राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे अपीलही दाखल केले नाही. अशा प्रकारे मूळ तक्रारीत झालेल्या आदेशाची पूर्तता न झाल्यामुळे रामदास सोले यांनी पुन्हा ग्राहक मंच यांच्याकडे चौकशी अर्ज दाखल करून आरोपी आयुक्त भविष्य निर्वाह निधी यांच्यावर ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली. ग्राहक मंचामार्फत त्यांच्यावर समन्सची बजावणी झाल्यामुळे मंचासमोर हजर होऊन गुन्हा मान्य केला नाही.

आरोपीने घेतलेला उलट तपास व फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313 नुसार घेतलेले जबाब तसेच दोन्ही पक्षाचा युक्तिवाद यांचे अवलोकन करून ग्राहक मंचाने भविष्य निर्वाह निधी विभागाला आदेशाप्रमाणे 60 दिवसात पालन केले नाही असा निष्कर्ष काढून कलम 27 प्रमाणे दंड व शिक्षेस पात्र ठरवले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)