महाआघाडीतर्फे जिल्हा उपनिबंधकांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन

नगर – नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरव्यवहार उघडकीस आला असतांनाही जिल्हा उपनिबंधकांकडून बाजार समितीवर कोणतीही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ महाआघाडीच्या वतीने आज जिल्हा उपनिबंधकांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, सभापती रामदास भोर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, पंचायत समिती सदस्य रवींद्र भापकर, संदीप गुंड, गोरख काळे, अमोल कदम यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषि उत्पन्न बाजार समितीने मोकळ्या जागेवर अनधिकृतपणे गाळे उभारले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांचा पीएफ ही भरलेला नसल्याची तक्रार महाआघाडीने जिल्हा उपनिबंधकाकडे केली होती.तक्रारीवरुन चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. समितीने अहवाल देवून दोन महिने झाले.

-Ads-

बाजार समितीने गैरप्रकार केला असल्याचे सिद्ध झाले असताना जिल्हा उपनिबंधकांनी कलम 40 अन्वये बाजार समितीला नोटिस देवून खुलासा मागविला आहे. थेट कारवाईचे अधिकार असताना बाजार समितीवर कारवाई केली जात नाही. बाजार समितीवर कारवाईसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आल्याचे कार्ले यांनी सांगितले.

दरम्यान, बाजार समितीने काही प्रॉव्हिडंट फंड भरला असल्याचे सांगितले आहे.परंतु, तो कोणत्या खात्यात भरला आहे. हे जिल्हा उपनिबंधकांनी दाखवावे. फंडच भरलेला नसल्यामुळे बाजार समितीवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाआघाडीकडून करण्यात आली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)