मनमाड-दौंड लोहमार्गावर 80 ठिकाणी भूयारी मार्ग करणार

कोपरगाव – सन 2020 पर्यंत मनमाड ते दौंड या लोहमार्गावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने 80 ठिकाणी भूयारी मार्ग तयार करण्यात येतील, अशी माहिती साईबाबा संस्थानचे विश्‍वस्थ बिपीन कोल्हे यांनी दिली. कोपरगाव रेल्वेस्थानकानजीक शिंगणापूर येथे मनमाड ते दौंड लोहमार्गावर भूयारी मार्गाच्या कामाचा प्रारंभ कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

भीमा संवत्सरकर व संचालक मच्छिंद्र लोणारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. माजी सरपंच यादवराव संवत्सरकर, कैलास संवत्सरकर व संजय तुळस्कर यांनी भूयारी मार्गाची माहिती दिली. याप्रसंगी सहकार महर्षी कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे, संचालक भास्करराव भिंगारे, फकीरराव बोरनारे, प्रदीप नवले, संजय होन, कामगार नेते मनोहर शिंदे, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष संभाजीराव गावंड, विजय रोहोम, माजी सभापती सुनील देवकर, साहेबराव रोहोम, बाळासाहेब रूपनर, राजेंद्र रूपनर, भाऊसाहेब वाघ यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हे म्हणांले, केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल व तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांना आंतरराष्ट्रीय धार्मिक क्षेत्र शिर्डी व आसपासचे महत्व पटवून देऊन कोपरगाव रेल्वेस्थानकावर त्यादृष्टीने कराव्या लागणाऱ्या रेल्वे सुविधा व मनमाड-दौंड लोहमार्गाच्या अडचणी सांगितल्या होत्या.

शिंगणापूर रेल्वेचौकी रेल्वे वाहतुकीमुळे सतत बंद राहात होती. त्याचा फटका वाहतुकदारांना बसत होता. त्यासाठी भूयारी रेल्वेमार्गाची मागणी केली होती. ती आज प्रत्यक्षात आली. त्यासाठी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. मनमाड-दौंड या एकेरी लोहमार्गावर रेल्वेवाहतूक वाढल्याने त्याच्या दुहेरीकरणाचे काम पुढच्या पावसाळ्यापासून हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)