पाथर्डी व भिंगारातील जुगारांवर छापे; 10 जणांना अटक

सात ठिकाणच्या छापेमारीत 31 हजारांचा मुद्देमाल जप्त

नगर – स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सात ठिकाणी अवैध धंद्यावर छापा घातल सुमारे 10 जणांविरोधात कारवाई केली. या छापामारीत सुमारे 31 हजार 448 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. करंजी (ता. पाथर्डी) येथे घातलेल्या छाप्यात तीन हजार रुपयांची देशी-विदेशी विनापरवाना मद्य जप्त करण्यात आले. राजून रामदास अकोलकर याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

तिसगाव येथे शेख अस्लम मकबूल व भीमराज नाथा गोलवड या दोघांना चिठ्ठ्यांवर आकडे लिहून देऊन लोकांकडून जुगार खेळताना आढळले. त्यांच्याकडून 2 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सौरभ भाऊसाहेब चव्हाण, संदीप जगन्नाथ डेंगळे (दोघे रा. कसबा), सुरज शामराव दहिाळे (रा. इंदिरानगर), प्रसाद भागवत राठोड (रा. आनंदनगर, ता. पाथर्डी) या चौघाना तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले. या चौघांकडून 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

भिंगार येथील खळेवाडी येथे बाबासाहेब भानुदास सुतार (रा. खळवाडी) याच्याकडून3 हजार रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली. लखन गोरख डावखर (रा. बाराबाभळी, ता. नगर) याला जुगारात अटक केली. त्याच्याकडून सुमारे 1 हजार 110 रुपये जप्त करण्यात आले. सुखदेव केशरदेव इरगस (रा. एमजीरोड, भिंगार) याला जुगारात अटक केली. त्याच्याकडून 1 हजार 10 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस कर्मचारी मन्सूर सय्यद, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, संतोष लोढे, सचिन अडबल, राहुल सोळुंके, बबन बेरड हे पोलीस कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)