शासनकडून शेतकऱ्यांची होतेय गळचेपी – गडाख

करजगांव – बोंडअळी, हुमणी अळी, हवामानातील बदल, अपुरा पाऊस, दुष्काळ आदी गोष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. सरकार शेतकऱ्यांना मदत करायचे सोडून शेतीविरोधी धोरण अंमलात आणत असल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.या सर्व गोष्टीमुळे शासनाकडून शेतकऱ्यांची गळचेपी होत असल्याचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले. ते निभांरी (ता.नेवासा) येथे शेतकरी अशोक गायके यांच्या वस्तीवर आयोजित दिवाळी फराळ व स्नेहमेळावा कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

शेतकरी काबाडकष्ट करीत शेती पिकवितो. शेतकऱ्यांनी शेतीची अर्थव्यवस्था मोठ्या कष्टाने बदलुन आपली प्रगती केली. शेतीमालाला भाव व तरुणांच्या हाताला काम असेल तर समाजाची प्रगती शक्‍य असल्याचे गडाख म्हणाले.

यावेळी बाजार कमिटीचे चंद्रकांत जाधव, मुळा कारखान्याचे संचालक संजय जंगले, प्रगतचे आप्पासाहेब जाधव, बाबासाहेब पवार, भगवान जाधव, अर्जुन जाधव, लक्ष्मण शिरसाठ,गहिनीनाथ शिरसाठ, कर्णासाहेब जाधव, दादासाहेब जाधव, गंगाराम जाधव, संदीप जाधव, रमेश जंगले, सोपान गवळी, भिवाजी गर्धे, नारायण जाधव, रंगनाथ जाधव, नारायण जाधव आदीसह निभांरी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक शरद जाधव यांनी केले. सूत्रसंचालन व आभार ज्ञानेश्वर संस्थांनचे विश्वस्त कैलास जाधव यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)