दहिगाव, बेलापूर महसूली मंडळात दुष्काळ जाहीर

File photo

कोपरगाव – राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 151 तालुक्‍यापैकी नगर जिल्हयातील 11 तालुक्‍यासह आता ज्या महसूली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत तालुक्‍यात सरासरी पर्जन्यच्या 75 टक्‍केपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मि.मि पेक्षा कमी झाला आहे.

अशा 268 महसूली मंडळापैकी नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्‍यातील दहिगाव व श्रीरामपूर तालुक्‍यातील बेलापूर या महसूली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.

या महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित झाल्यामुळे जमीन महसूलात सूट, सरकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33.5 टक्‍के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्‍यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅकर्सचा वापर व टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)