दूध रुपांतरण अनुदान योजनेस मुदतवाढ

31 जानेवारीपर्यंत मिळणार 5 रुपये अनुदान

नगर  – राज्यातील उत्पादित होणारे पिशवीबंद दूध वगळून उर्वरित 3.2 व 8.3 गाय दूध व त्यापेक्षा अधिक गुणप्रतीच्या दूध रुपांतरण अनुदान योजनेच राज्य शासनाने आता मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे 31 ऑक्‍टोबरला बंद झालेले 5 रुपये अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. 1 नोव्हेंबर ते 31 जानेवारी 2019 अशी दोन महिने मुदतवाढ अनुदानास देण्यात आली आहे. तसा आदेश प्रधान सचिवांनी दि. 17 नोव्हेंबरला काढला आहे.

शासनाने राज्यातील उत्पादित होणारे पिशवीबंद दूध वगळून उर्वरित 3.2 व 8.3 गाय दूध व त्यापेक्षा अधिक गुणप्रतीच्या दूधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय घेवून ही योजना 1 ऑगस्ट ते 31 ऑक्‍टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी राबविली होती. परंतू त्यानंतर या योजनेबाबत नाहीच स्पष्टीकरण न झाल्याने ही योजना ठप्प होवून अनुदान देणे बंद करण्यात आले होते. सहकारी व खासगी दूध संघाकडून अनुदान बंद झाल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्‍त करण्यात आली होती.

हे लक्षात घेवून शासनाने पुन्हा या योजनेला मुदतवाढ दिली आहे. या अनुदानामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. परंतू अनुदान बंद झाल्यानंतर दूध संघाकडून ते अनुदान देणे बंद केले होते. मागणीनुसार शासनाने आपला निर्णय बदलून पुन्हा अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. दूध भुकटी व द्रवरुप दूधाची निर्या करण्यासाठी सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पांना अनुक्रमे 50 रुपये प्रति किलो आणि 5 रुपये प्रति लिटर प्रोत्साहनपर अनुदान काही अटी व शर्तीच्या अधीन राहुन मंजूर केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)