ना हरकतीमुळे मनपाचा वाढला कर

निवडणुकीतील इच्छुकांनी कर भरण्यासाठी धावपळ

नगर – महापालिका निवडणुकीने वेग घेतला आहे. राजकीय पक्षांकडून इच्छुकांच्या उमेदवारी जाहीर झाल्या आहेत. काही बाकी आहेत. अनेक इच्छुकांची फौज निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहे. महापालिकेने इच्छुक उमेदवारांना थकाबाकी नसल्याचे दाखले अनिवार्य केले आहे. हा थकबाकीचा कर भरण्यासाठी इच्छुकांची महापालिकेच्या विविध विभागात झुंबड उडाली आहे. निवडणुकीच्या काळात महापालिकेकडे 1 कोटी 85 लाखांचा कर भरणा झाला आहे.

-Ads-

महापालिकेला कर वसुलीसाठी विविध उपाययोजना कराव्या लागतात. कर वसुलीसाठी कधी सक्ती करावी लागते, तर कधी कारवाई. तरी देखील कर वसुली होत नाही. परंतु महापालिका निवडणुकीमुळे महापालिकेच्या तिजोरीत कर रुपाने भरणा वाढला आहे. इच्छुक उमेदवारांना महापालिकेकडील कोणत्याही विभागाचा कर बाकी नसल्याचा दाखल देणे अनिवार्य आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी कर भरण्यास सुरूवात केली आहे.

गेल्या काही दिवसात महापालिकेच्या तिजोरीत सुमारे 1 कोटी 85 लाखांचा कर जमा झाला आहे. हाच कर गोळा करण्यासाठी महापालिकेला तीन महिन्यांभरापूर्वी शास्तीमाफीचा निर्णय घ्यावा लागला होता. या निर्णयावरून महापालिकेत राजकारण देखील रंगले होते. आंदोलने झाली होती. परंतु निवडणुकीच्या निमित्ताने हा कर महापालिकेकडे येऊ लागला आहे.

दरम्यान, उमेदवारांनी कर भरताना काही पळवाटा शोधल्या आहेत. इच्छुक उमेदवारांना अर्ज भरताना सूचक आणि अनुमोदन गरजेचे असते. मालमत्ताधारकांना सूचक आणि अनुमोदन केल्यास त्याला कर पूर्णपणे भरावा लागतो. यातून पळवाट काढताना इच्छुकांनी सूचक आणि अनुमोदक हे भाडेकरी दाखविले आहे. त्यामुळे यातून जमा होणार कर वगळला गेला आहे. सूचक आणि अनुमोदक हे महापालिकेचे मालमत्ताधारक असते, तर हा कर वाढला असता असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)