नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

जामखेड – येथील नगरसेविकेच्या पतीने नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना फोनवरून शिवीगाळ व धमकी दिली. या घटनेचा निषेध म्हणून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले.

प्रभाग क्रमांक चारमधील मिलिंदनगर भागातील घराजवळील रस्त्यावर अडथळा ठरणारे अतिक्रमण नगरपरिषदेचे अतिक्रमण विभाग प्रमुख शंकर बोराटे यांनी जेसीबीच्या साह्याने हटविले. यानंतर प्रभागातील नागरीकांनी नगरसेविका विद्या वाव्हळ यांचे पती राजेश वाव्हळ यांना सदर घटना सांगितली.

यानंतर शुक्रवारी (दि.17) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास वाव्हळ यांनी अतिक्रमण विभागाचे विभाग प्रमुख शंकर बोराटे यांना फोन केला व माझ्या प्रभागातील अतिक्रमण तु कोणाला विचारुन काढले, तुझी हिम्मत कशी झाली, तुझ्याकडे पाहुन घेतो असे म्हणून शिविगाळ व दमदाटी केली. तसेच मुख्याधिकारी यांनाही शिवीगाळ केली.

या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (दि.17) रोजी नगरपरिषदेचे कामकाज बंद करून या घटनेचा निषेध केला, तसेच संबंधित नगरसेविकेच्या पतीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी नगरपरिषदेचे सहकार्य निरीक्षक महेंद्र तापकीर, कर निरीक्षक दिगंबर देशमुख, पाणीपुरवठा विभागाचे अजिनाथ गीते, कर्मचारी राजेंद्र गायकवाड, संजय खेत्रे, शंकर बोराटे, प्रमोद टेकाळे, हितेश वीर, रज्जाक शेख, कृष्णा वीर आदी कर्मचारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)