पाथर्डीत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

पाथर्डी – हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा 6 वा स्मृतिदिन पाथर्डी शहरात साजरा करून त्यांना अभिवादन करण्यात आले. शिवसेनेच्यावतीने शहरात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी व आदरांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अनेक मान्यवरांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. स्वर्गीय ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांनी त्यांच्या आठवणी ताज्या केल्या. स्वर्गीय बाळासाहेबांच्या आठवणींनी शिवसैनिक भावूक झाले होते.

-Ads-

पाथर्डी तालुका व शहर शिवसेनेच्यावतीने शिवसेना उपतालुका प्रमुख भगवान दराडे, शहर प्रमुख भाऊसाहेब धस, अप्पा सातपुते, संतोष एडके, सुनील परदेशी, रवी औटी, योगेश बोरुडे, अभिनव इजारे, ज्ञानेश्वर भाबड, बाळासाहेब दहिफळे, प्रविण वाघमारे, प्रशांत भापकर, बाळासाहेब बोरुडे, आदर्श काकडे, अमोल भापकर, चंद्रकांत भापकर, ईश्वर गायके, सुनील रनाते, अंबादास ठोंबरे, राजू शिरसाट, विशाल भापकर आदींसह अनेक शिवसैनिकांनी ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)