मुळा पाटबंधारे विभागाच्या गोडाउनला आग

चाळीस पन्नास वर्षापुर्वीची कागदपत्रे जळून खाक

राहुरी खुर्द – येथील मुळा पाटबंधारे विभागाच्या गोडाउनला आग लागल्याने सुमारे चाळीस पन्नास वर्षापुर्वीची कागदपत्रे जळून खाक झाल्याने खळबळ उडाली. याबाबत सविस्तर माहिती अशी, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास राहुरी खुर्द येथील मुळा पाटबंधारे खात्याच्या गोडाउनला अचानक आग लागल्याचे वायरलेस विभागाचे कर्मचारी जमदाडे यांच्या निदर्शनास येताच, खात्यातील अधिकाऱ्यांना माहिती देईपर्यंत गोडाऊन मधील भरगच्च कागदपत्रे व लाकडी कपाटांनी पेट घेतल्याने परिसरात धुराचे लोट पसरल्याने परिसरात मोठी धांदल उडाली.

राहुरी व देवळाली नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या सहायाने सुमारे तीन तास प्रयत्न करुन आग आटोक्‍यात आणली .पाटबंधारे खात्याचे उपभियंता ए. बी. खेडकर यांनी माहिती देतांना सांगीतले की, या गोडाऊनमध्ये खात्यातील सुमारे तीस ते चाळीस वर्षापुर्वीची निकामी कागदपत्रे, लाकडी मांडण्या होत्या, कागदपत्रे जळाल्याने खात्याच्या कामकाजावर कुठलाही परिणाम होणार नसून चालू कागदपत्रे सुरक्षित आहेत.

गोडाउनमध्ये विज पुरवठा नसल्याने आग कशामुळे लागली याचा शोध घेत असल्याने सांगितले. घटनेची खबर पोलिसांना देण्यात आली आहे. यावेळी शाखा अभियंता पी. पी. तनपुरे, अण्णासाहेब आंधळे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)