तरुणास मारहाणीप्रकरणी माजी उपसरपंचासह नऊ जणांवर गुन्हा

सुपे  – पारनेर तालुक्‍यातील वडनेर हवेली येथील सौरभ साहेबराव वाळुंज यास म्हसणे-पारनेर रस्त्यावर पाच-सहा तरुणांनी काठ्या, तलवारीने मारहाण केली. या प्रकरणी माजी उपसरपंचासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 17) सायंकाळी घडली. या प्रकरणी वाळुंज यांच्या तक्रारीवरून सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सौरभ वाळुंज हा खासगी कंपनीत काम करतो. तो काम संपवून घरी वडनेर हवेलीला जात असताना म्हसणे फाट्यावरुन अज्ञात इसमाने लिफ्ट दिली. एक किलोमीटर पुढे जाताच माहून आलेल्या जीपमधील व्यक्तींनी शिवीगाळ करून त्यांना काठ्या व तलवारीने जबर मारहाण केली. त्यानंतर ते पळून गेले. या प्रकरणी वाळुंज यांच्या फिर्यादीवरून माजी उपसरपंच राजीव दादाभाऊ सोनुळे, प्रताप भाऊसाहेब सोनुळे, बाळू गंगाराम सोनुळे, किरण भाऊसाहेब सोनुळे (चौघे रा. वडनेर हवेली, सध्या शिरूर) यांच्यासह चार अनोळखी इसमांसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी सध्या सुपा येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

रविवारी उशिरा चौघांवर सुपा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉन्स्टेबल वनाजी धामणे करत आहेत. सुपा परिसरात गुंडगिरीचा सुळसुळाट वाढला आहे.

परिसरामध्ये एमआयडीसी असल्याने गुंड प्रवृत्तीत वाढ होत आहे. औद्योगिक वसाहत जसजशी वाढत आहे, त्याच पद्धतीने गुंडांच्या टोळ्या देखील वाढताहेत. त्यावर पोलिसांचा जरब राहिलेला नाही. दिवसाढवळ्या चोऱ्या, हाणामारीचे प्रकार होत आहेत. त्याला आळा बसावा व गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

निवडणुकीच्या कारणातून मारहाण ?

गेल्या काही दिवसांपूर्वीच वडनेर हवेली ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीमध्ये सोनुळे गटाचा दारूण पराभव झाला होता. त्याच राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाला असल्याचे बोलले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)