राशीनला वीज अंगावर पडून महिलेचा मृत्यू ;दोन जनावरेही दगावली

कर्जत – तालुक्‍यातील राशीन नजीकच्या मोहिते वस्ती येथे शेतात गुरे चारीत असताना छाया बबन मोहिते (वय-33) या महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तसेच दोन जनावरेही दगावली. राशीनसह परिसरात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.

करपडी येथे पोपट दामू काळे यांच्या मालकीच्या घराशेजारी बांधलेल्या जर्सी गायीच्या अंगावर वीज पडल्याने ती जागीच ठार झाली. कामगार तलाठी लक्ष्मण जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसादरम्यान विज अंगावर कोसळल्याने मोहिते बेशुद्ध पडल्या.

-Ads-

नजीकच्या वस्तीवरील नातेवाईकांनी त्यांना उपचाराकरीता राशीनहून बारामती येथे हलविण्यात आले. मात्र यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मोहिते वस्ती व करपडी येथील दोन्ही घटना एकाच वेळी घडल्या आहेत. विजेच्या धक्‍क्‍याने काळे यांच्या राहत्या घराच्या भिंतीला तडे गेले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)