उसाला ‘एफआरपी’पेक्षा जादा दर मिळणार का ?

कारखानदारांकडून शेतकऱ्यांची उसदराची मागणी बेदखल

गंगामाईवर पडणार ऊस दराची पहिली ठिणगी……

गंगामाई कारखान्याकडील मागील हंगामाची उर्वरित रक्कम मिळण्यासाठी भाजपा व शेतकऱ्यांच्या वतीने नुकतेच आंदोलन करण्यात आले. मात्र कारखाना प्रशासनाने ही बाब गांभीर्याने न घेता अल्प रक्कम देऊन शेतकऱ्यांची चेष्टा केल्याची चर्चा तालुक्‍यात सुरु आहे. पुढील दर व मागील उर्वरित रक्कम लेखी आश्वासनानुसार मिळावी यासाठी गंगामाईवर उस दराची पहिली ठिणगी पडणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नेवासे – राज्यातील शेतकरी संघटनांनी उसाला एफआरपीपेक्षा 200 रुपये जादा दराची मागणी केली आहे. मात्र, गेल्यावर्षीचा अनुभव बघता साखर कारखानदार हा जादा दर देणार का? हा प्रश्‍न आहे. जिल्ह्यात शेतकरी संघटनेची बोटचेपी भूमिका व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आंदोलनाकडे झालेला कानाडोळा याला कारणीभूत आहे. यामुळे कारखानदारावरील दबाव कमी झाला असून केवळ एफआरपीवरच शेतकऱ्यांना समाधान मानावे लागण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्यावर्षी ऊस दरासाठी जिल्ह्यातील कारखानास्थळावर शेतकरी व संघटनांनी मोठ्या प्रमाणात आंदोलने केली. सरकार व शेतकरी संघटनेच्या नेत्यांमध्ये एफआरपीपेक्षा अधिक 200 रुपये असा दराचा तोडगा काढण्यात आला, मात्र जादा रक्कम देण्यात सर्वच कारखान्याकडून टाळाटाळ करण्यात आली. सक्षम कारखान्यांनीच केवळ एफआरपीप्रमाणे बिले दिली आहेत. बाजारात साखरेचे दर कोसळल्याने एफआरपीप्रमाणे दर मिळणे कठीण बनले आहे. काही कारखान्यांनी हंगामाच्या सुरवातीला 100 व 200 रुपये प्रतिटन जादा बिले देखील काढली. काहींनी हंगामात अडथळा येऊ नये म्हणून व दीपावलीसाठी 50, 100 व 200 रुपये प्रमाणे बिले दिली आहेत.

यावर्षीही हंगाम सुरु होऊन 15 ते 20 दिवस होत आले आहेत, मात्र अजून जिल्ह्यात शेतकरी संघटना व अन्य संघटनानी उस दरासाठी आंदोलन केले नाही, यामुळे कारखानदार आपला दर जाहीर करण्यास पुढे येणार नाहीत. मात्र उस पळवा-पळवी जोरात होणार असे चिन्ह आहे. शेतकरीदेखील पाण्याअभावी ऊसाची पीके जळू लागल्याने ऊस तोडीसाठी घाई करत आहे.

कारखाना निहाय 2017-2018 चा साखर उतारा

(1)संजीवनी- 10.07 (2) काळे- 10.33 (3) गणेश- 11.06 (4) विखे – 11.67
(5) अशोक -1054 (6) तनपुरे- 11.39 (7) श्रीगोंदे- 11.00 (8) थोरात- 11.24
(9) ज्ञानेश्वर- 11.21 (10) वृद्धेश्वर- 10.49 (11) मुळा- 10.83 (12) अगस्ती- 11.11 (13)केदारेश्वर – 9.10 (14) कुकडी – 10.82 (15) क्रांती शुगर- 11.01 (16) पियुष शुगर – 8.66 (17) अंबालिका (इंडेकोन) – 11.47 (18) गंगामाई – 10.33 (19) साईकृपा (1) – 10.68 (20) साईकृपा (2) खासगी साखर उतारा बंद होता (21) प्रसाद शुगर- 10.28 (22) जय श्रीराम – 9.44 (23) युटेक शुगर – 10.84

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)