राम कदम यांच्या पुतळयाचे नेवाशात दहन 

नेवासाफाटा – मुलगी नकार देत असेल तर मला सांगा तिला पळवून आणू. असे आक्षेपार्ह व वादग्रस्त विधान करणाऱ्या आमदार राम कदम यांच्या पुतळ्याचे नेवासा येथे महिलांच्या हस्ते दहन करण्यात आले. तसेच कदमांचा निषेध करण्यात आला. आमदार हा शासनाचा प्रतिनिधी व जबाबदार व्यक्तिमत्व असते. आमदार कदम यांनी स्रियांबद्दल केलेले बेताल वक्तव्य हे स्त्री शक्तीचा अपमान करणारे आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख सुनीता गडाख यांनी यावेळी बोलताना केले.

नेवासा येथील श्रीरामपूर रस्त्यावर असलेल्या श्री खोलेश्वर गणपती चौकामध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी तालुक्‍यातील स्त्रिया एकत्र आल्या होत्या. या आंदोलनाचे नेतृत्व गडाख यांनी केले. यावेळी ज्योती घोलप, नगरसेविका अंबिका इरले, अर्चना वल्ले, रुपाली लिंबोरे यांनी आमदार कदम यांच्या राजीनाम्याची मागणी आपल्या भाषणातून केली. यावेळी नायब तहसीलदार नारायण कोरडे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, जेष्ठ विधीतज्ञ के.एच.वाखुरे, नगरसेवक अँड.बापूसाहेब गायके, लक्ष्मण जगताप, फारुकभाई आतार, सचिन वडागळे, जितेंद्र कुऱ्हे, भाऊसाहेब वाघ, दीपक धनगे, बाळू कोकणे, महिला आघाडीच्या प्रतिभा चौधरी, अर्चना कुंभकर्ण, स्वाती मापारी, प्रिया शिंगी, मीना वंजारे, पुष्पा कळमकर यांच्यासह क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे पदाधिकारी व महिला उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)