कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणारा अटकेत

नेवासेफाटा – प्रवरासंगम हद्दीतील गोधेगाव-सिद्धेश्वर मंदिरादरम्यान मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बेकायदा जनावरांची वाहतूक करणारी पीकअप गाडी पोलिसांनी पकडली. यामध्ये सहा जनावरांसह पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. समीर अब्दुल रहीम कुरेशी (वय-24 रा.सिल्लेखाना पैठणगेट, औरंगाबाद) यांच्या विरोधात नेवासे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोधेगावकडून सिद्धेश्वर मंदिरमार्गे औरंगाबादकडे पीकअप (एम.एच -20 डीई- 7041)मधून कत्तल करण्यासाठी गोवंश जनावरांची वाहतूक करणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांना मिळाली. त्यानंतर कैलास साळवे, बाळकृष्ण गलधर यांनी गोधेगाव-सिद्धेश्वर मंदिर रस्त्यावरील डावखर वस्तीजवळ सापळा लावला. साडेदहाच्या सुमारास सिद्धेश्वर मंदिराच्या दिशेने येणारी पीकअप दिसली.

-Ads-

पोलिसांनी पीकअप अडवून तपासणी केली. तीत तीन गाई व तीन लहान बैल दोरीने बांधून ठेवले होते. पोलिसांनी सहा जनावरांसह एक पीकअप गाडी असा पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. समीर अब्दुल रहीम कुरेशी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)