विठ्ठल घुले महाराज पुण्यतिथी साजरी

नेवासेफाटा – वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक विठ्ठल महाराज घुले यांची पुण्यतिथी नेवासे येथे साजरी करण्यात आली. घुले महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे हजारो कीर्तनकार महाराष्ट्रात घडविले. त्यांचे कार्य समाजाला दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन भगवान महाराज गोडसे यांनी केले.

नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व माजी विद्यार्थी सद्‌गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन गुरुवारी (दि. 4) रोजी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये करण्यात आले. यावेळी झालेल्या पुण्यतिथी सोहळ्याप्रसंगी सद्‌गुरु विठ्ठल महाराज घुले यांच्या प्रतिमेचे पूजन संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख, हभप उध्दव महाराज मंडलिक, श्रीराम साधना आश्रमाचे सुनिलगिरी महाराज, भगवान महाराज गोडसे, रामानंदगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

-Ads-

यावेळी सर्वांचे स्वागत नंदकिशोर खरात महाराज यांनी केले. यावेळी बाळकृष्ण सुडके महाराज, गहिनीनाथ आढाव महाराज, अमृतानंद कांकरिया महाराज, कारभारी महाराज पंडित, राजाराम तुवर महाराज, राजेंद्र आसने महाराज, चांगदेव काळे महाराज, राम खरवंडीकर महाराज, बाळकृष्ण महाराज दिघे, हरी भोगे महाराज, गणेश आरगडे महाराज, संत सेवेकरी बदाम पठाडे महाराज यांच्यासह भाविक उपस्थित होते. यावेळी सलाबतपूर येथील मच्छिंद्र महाराज निकम यांच्यातर्फे उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)