कर्जबाजारी शेतकऱ्याची मुलासह आत्महत्या

नेवासेफाटा – तालुक्‍यातील खरवंडी येथील शेतकरी बाबासाहेब पोपट आलवणे (वय 35) यांनी कर्जबाजारीपणामुळे मुलगा संकेत (वय 6) याच्यासह मुळा उजवा कालव्यात मंगळवार दि. 11 रोजी रात्री 7 वा.पाण्यात उडी घेवून आत्महत्या केली.

बाबासाहेब यांचा मृतदेह गुरूवारी सकाळी 10 वा. कौठा शिवारात तर संकेत याचा मृतदेह शुक्रवार दि. 14 रोजी सकाळी 8 वा. रस्तापुर शिवारात पाटाच्या पाण्यात आढळला.

याबाबत मयत बाबासाहेब आलवणे यांचे मेव्हणे सुधाकर अंबादास होंडे यांनी शनिशिगणापूर पोलीसांना मिसिंगची खबर देताना सांगीतले की, मंगळवार दि. 11 रोजी सायंकाली 7 वा. बाबासाहेब यांचा फोन आला. मी कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करीत आहे. मृतदेह मिळाल्यानंतर पंचनामा करून अंत्यविधी करण्यात आला.

याबाबत सोनई व शनिशिंगणापूर पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मयत बाबासाहेब हे आजोबाच्या नावावर असलेली दोन एकर शेती करत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)