आश्वासनानंतर पाचुंदेतील उपोषण मागे

बालाजी देडगाव – नेवासे तालुक्‍यातील पाचुंदा येथे ग्रामपंचायत कार्यालासमोर विविध मागण्यांसाठी एकनाथ राजू माने व शहाजी मेसू पटारे या ग्रामस्थांनी सुरु केलेले उपोषण नेवासे पंचायत समितीच्या सभापती, गटविकास अधिकारी व नायब तहसीलदारांच्या लेखी आश्वासानानंतर मागे घेण्यात आले.

शाळेजवळील संपूर्ण अतिक्रमण हटवावे, घरकुल प्रकरणात आर्थिक घोटाळा प्रकरणी तपास करून गुन्हा दाखल करावा, दोषी सदस्यांचे ग्रामपंचायत सदस्य पद रद्द करावे, शाळेजवळील विषारी औषधे व खते यांचे अतिक्रमणातील दुकान हटवून अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, नळयोजना घोटाळ्याबाबत चौकशी करावी या मागण्यासाठी हे उपोषण करण्यात येत होते.

-Ads-

या उपोषणकर्त्यांची सभापती कल्पना पंडित, गटविकास अधिकारी शेलार, नायब तहसीलदार गायकर यांनी भेट घेत शाळेशेजारील अतिक्रमण त्वरित काढण्याचे तर घरकुल व इतर घोटाळ्यांची 20 दिवसांत चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिले, यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी सर्कल जाधव, कृषी अधिकारी काळे, कृषी सहायक प्रशांत पाटील, ग्रामसेवक काळे बी.बी., झुंबर माने, सोपान टकले, भाऊसाहेब होंडे, एकनाथ होंडे, महादेव झेबाजी वाघमोडे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)