मराठा महासंघाच्यावतीने शनिदेवास अभिषेक

नेवासे – मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याबद्दल शनी देवास अभिषेक करीत लाडू व पेढ्यांचे वाटप करण्यात आले. हा जल्लोष नसून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनपूर्ती निमित्त त्यांच्या नावाने प्रसाद असल्याचे शेतकरी महासंघाचे संभाजी दहातोंडे यांनी सांगितले. शनी शिंगणापूर येथे 15 नोव्हेंबर रोजी झालेल्या शेतकरी-वारकरी महासंमेलनात मुख्यमंत्र्यांनी
आंदोलन कशाला करता आता 1 डिसेंबरला जल्लोषच साजरा करा, असे म्हणत शनी देवाच्या दरबारीच मराठा आरक्षणाची घोषणाच केली होती.

मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 1 डिसेंबरच्या अगोदरच राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मराठा आरक्षण पास करण्यात आल्यामुळे शेतकरी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी शनी शिंगणापूर येथे येऊन शनिदेवास विधिवत अभिषेक घालत स्वयंभू मूर्तीवर तेलाचा अभिषेक करत, मुख्यमंत्र्यांच्या नावाने त्यांच्या वजनाइतके लाडू व पेढ्यांचा प्रसाद दाखविला.

-Ads-

या प्रसादाचे मंदिर परिसरात वाटप केले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेकांनी बलिदान दिले.गेल्या वीस वर्षापासून स्व. आण्णासाहेब पाटील यांच्यासारख्या अनेकांनी आरक्षणाची मागणी केली होती. परंतु कोपर्डीच्या घटनेनंतर सर्व समाज एकत्र येऊन लढा दिला. आरक्षणाचे श्रेय हे एकट्या कुणाचे नसून सर्व सामाजाचे असल्याचे दहातोंडे यांनी सांगितले.

यावेळी मराठा महासंघाचे युवक प्रदेश अध्यक्ष संतोष नानवटे, शेतकरी महासंघाचे उपाध्यक्ष मनोहर वाडेकर, जिल्हाध्यक्ष शिवाजी डौले, रमेश बोरुडे, भाजपचे जिल्हा युवक उपाध्यक्ष सुभाष पवार,श्‍यामराव पवार, अँड. सयाराम बानकर, आबासाहेब दहातोंडे, किरण जावळे, संतोष हंबर, भाऊसाहेब वाकचौरे, बंडू वामन आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)