सह्याद्रीचे पाणी पुर्वेस वळविण्यासाठी बेमुदत उपोषण

नेवासे – सह्याद्री माथ्यावरील पश्‍चिम वाहिनी नद्यांचे अरबी समुद्राला जाणारे पाणी पुर्वेकडील गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी राज्य शासनाने तातडीने निर्यण घ्यावा व 2015-16 चे दुष्काळी अनुदान तातडीने द्यावे यासाठी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन व भारतीय जनसंसदेचे नेवासा तालुका कार्यकर्ते बुधवार (दि.28) पासुन मुंबई विधानभवनासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहेत .

सद्यस्थितीत मराठवाडा विरुध्द नाशिक व नगरजिल्हा असा वाद पाण्यासाठी चालु झाला आहे. पुढील काळात त्यानिमित्त मोठा संघर्ष होऊ शकतो, तसे होऊ नये व नगर सह 8 ते 10 जिल्ह्यांचा कायमस्वरुपी पाणीप्रश्न सुटावा यासाठी नेवासा तालुका भारतीय जनसंसदचे तालुकाध्यक्ष रामराव भदगले, अॅड. विठ्ठलराव जंगले, डॉ. अशोकराव ढगे, पत्रकार कारभारी गरड आदी प्रयत्नशिल आहेत.

शनिशिंगणापुर येथे मुख्यमंत्री आले असता त्यांना याबाबत सविस्तर निवेदन दिले आहे. तसेच दि. 27 पर्यंत शासन स्तरावरुन समाधानकारक उत्तर न मिळाल्यास अधिवेशन काळात दि. 28 पासुन मुंबई येथे विधानभवना समोर भदगले ,अॅड. जंगले, डॉ. ढगे, पत्रकार गरड बेमुदत उपोषणास बसणार आहेत.

याबाबत मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या उपोषण निवेदनात म्हटले आहे की, कै. खा. बाळासाहेब विखे यांनी काही वर्षापूर्वी याच मागणीचा आग्रह धरला होता. तसेच आमची संघटना तीन वर्षांपासुन पाठपुरावा करत आहे. हा अतिशय महत्वकांक्षी नद्याजोड प्रकल्प राज्य शासनाने तातडीने हाती घेतल्यास नाशिक, अ. नगर आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, बिड, जालना, परभणी, नांदेड आदी जिल्ह्यांचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघेल.

पश्‍चिमेकडे वाहणाऱ्या तानसा, वैतरणा, तापी आदी नद्यांचे पावसाचे पाणी अरबी समुद्रात वाहुन जाते. तेच पाणी सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर नद्या जोड प्रकल्पांतर्गत वळविल्यास गोदावरी खोऱ्यात पाण्याची उपलब्धता कायम राहिल.शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्यास हा प्रकल्प फायदेशीर राहिल.

याच निवेदनात संघटनेने मुख्यमंत्र्यानी 2015 – 16 सालच्या दुष्काळी अनुदानाची घोषणा केल्याचे व अद्यापही न दिल्याचे निदर्शनास आणुन दिले आहे. ते तातडीने देण्याची मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रती विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ.शिवाजीराव कर्डीले, आ.मोनिकाताई राजळे,जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
2 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)