ऊस वाहतूक वाहतूकदारांकडून नियमांची ऐसीतैसी

कर्णकर्कश स्पीकर कधी बंद होणार

रात्रीच्या वेळी अनेक ट्रॅक्‍टरचालक आपल्या ट्रॅक्‍टरवर कर्णकर्कश स्पीकरवर गाणी वाजवतात. त्यामुळे पाठीमागून आलेल्या व पुढील वाहनांनी कितीही हॉर्न वाजवले तरी त्यांना हे ट्रॅक्‍टरचालक रस्ता देत नाहीत. अनेकता या कर्णकर्कश आवाजामुळे अपघातांनाही निमंत्रण मिळते. त्यामुळे ट्रॅक्‍टरवरील हे कर्णकर्कश स्पीकर कधी बंद होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नेवासे : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वाहतूक वाढली आहे. मात्र ऊस वाहतूक करणाऱ्यांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याने ग्रामस्थांचा जीव धोक्‍यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या या ऊसवाहतूक करणाऱ्या चालकांवर कारवाई होणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

सध्या ग्रामीण भागात ऊस कारखान्यांच्याचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत. त्यामुळे कारखान्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. अनेक वाहनचालक नवखी असल्याने ती रस्त्यावरून अडवीतीडवी वाहने चालवत आहेत. तसेच प्रमाणापेक्षा जास्त ऊस वाहनांतून वाहतूक केला जात आहे. तसेच या वाहनचालकांकडून वाहतुकीचे नियम सर्रास मोडले जातात. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

“अनेक वाहनचालकांकडे वाहन चालन परवाना नसतो. काहीचे तर वयही पूर्ण नसते. मात्र तरीही त्यांच्याकडून ऊस वाहतूक सुरू आहे. मात्र तरीही प्रशासन याकडे डोळेझाक का करत आहे ? – राजेंद्र बागडे, शिवसेना शहरप्रमुख, कुकाणा.

-Ads-

मागील अनेक वर्षांचा अनुभव पाहता, ऊस वाहतुकीच्या काळात अपघातांचे प्रमाण वाढते. अशा अपघातांत घरातील कर्ती व्यक्ती गेल्याने कुटुंबे देशोधडीला लागली आहेत. सध्या रात्रीच्या वेळी अशी ऊस वाहतूक करणारी वाहने रस्त्याच्या कडेला कशीही उभी करण्यात येतात. या वाहनांवर रिफ्लेक्‍टर लावलेली नसतात. तसेच पार्किंग लाईट लावण्याची व्यवस्था नसते.

सध्या गाळप हंगाम जोरात सुरू असून, उसाची कमतरता लक्षात घेऊन प्रत्येक साखर कारखाने गेटकेन ऊस आणण्यावर भर देत आहेत. त्यामुळे कारखाना परिसरातील रस्त्यांवर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाची वर्दळ वाढलेली आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या अनेक बैलगाड्या तसेच ट्रॅक्‍टर ट्रॉलीच्या मागे रिफ्लेक्‍टर नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

“रस्त्यावर अस्ताव्यसतपणे ऊस वाहतुकीची वाहने लावली जातात. त्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. मात्र तरीही या चालकांच्या वागणुकीत कुठलाही फरक पडलेला नाही. त्यामुळे ही वाहने रस्त्याच्या कडेला लावताना त्यांना काही नियम लावण्याची गरज आहे. – भैरवनाथ भारस्कर, लहुजी सेना अध्यक्ष

काही वाहनांना असले, तरी उसाच्या मोळीमुळे काही वेळा हे रिफ्लेक्‍टर दिसत नाहीत. त्यामुळे लहान-मोठे अपघात होतात. अनेक वाहनांचे रिफ्लेक्‍टर खराब झाल्याने दिसतही नाही. उसाने भरलेले ट्रॅक्‍टर व बैलगाड्या रस्त्यावर उभ्या असता. त्यामुळे कसरत करत वाहने चालवावी लागतात.

अनेकदा ऊस वाहतुकीची वाहने ओव्हरटेक करताना उलटतात. त्यामुळेही अनेकांचा नाहक बळी गेलेला आहे. त्यामुळे ऊस गाळप हंगाम सुरू होताच शासनच्या वाहतूक विभागाने सतर्क राहून वाहनांची तपासणी करण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत. मात्र याकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)