कुकाण्यात अवैध वाहतूकीवर कारवाई 

नेवासे  – नेवासे पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक रणजीत डेरे यांनी तालुक्‍यात अवैध धंद्‌याविरोधात कारवाई सुरु केली आहे. कुकाणे येथे गुरवारी ( दि.22) आठवडे बाजार असल्याने येथे नेवासे- शेवगाव मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वाहने लागलेली असतात. तसेच ऊस वाहतूकीमुळे येथे नेहमीच वाहतूक जाम होत असते. यामुळे झालेल्या अपघातात अनेकांनी प्राण गमावले आहेत.

गुरुवारी दुपारी घोडेगाव चौक या ठिकाणापासून रस्त्यावर व दुकानासमोरील मोटार सायकल व अन्य वाहने तसेच बस्थानकावरील फळविक्रेत्यांच्या गाड्या सुरळीत करत विविध वाहनांवर सुमारे 2000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

-Ads-

ही कारवाई डेरे यांच्या नेतृत्वाखाली कुकाणे येथील हवालदार विठ्ठल गायकवाड, हवालदार तुळशीराम गीते, पोलीस नाईक बबन तमनर, पोलीस बाळासाहेब नागरगोजे, सचिन गणगे, पोलीस नाईक संतोष फलके, दिलीप राठोड यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)