शेतीसाठी व्यावसायिक दृष्टिकोन हवा

भेंडा (ता. नेवासे) लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त बिव्हीजीचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांना मारुतरावजी घुले पाटील स्मृती पुरस्कार प्रदान करतांना ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले पाटील.

हणमंतराव गायकवाड : भेंडे येथे मारुतराव घुले पाटील स्मृती पुरस्कार वितरण

नेवासे/ भेंडा – शेतीचा उत्पादन खर्च वाढला असून उत्पन्न कमी झाले आहे. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी सेद्रींय शेती करणे आवश्‍यक झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून पाहिले पाहिजे, असे आवाहन भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी केले.

नेवासा तालुक्‍यातील भेंडा येथील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या 88 व्या जयंती निमित्त ज्ञानेश्वर कारखाना सांस्कृतिक मंडळाचे वतीने देण्यात येणारा सन 2018 चा लोकनेते मारुतरावजी घुले पाटील स्मृती पुरस्कार गायकवाड यांना ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, ज्येष्ठ संचालक ऍड. देसाई देशमुख, माजी खासदार तुकाराम गडाख, शेवगावचे सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील, संचालक काकासाहेब नरवडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, काशिनाथ नवले, नागेबाबा मल्टिस्टेट पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, संभाजीराव दहातोंडे, अशोक कारखान्याचे अध्यक्ष दिगंबर शिंदे, दिलीपराव लांडे, बानाभाऊ सुकाळकर, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे उपस्थित होते.

गायकवाड म्हणाले, भारत हा सर्वात तरुण देश आहे. होतकरू तरुणांना जगात अनेक संधी उपलब्ध आहेत. फक्‍त त्या संधी शोधा, घरापासून दूर जाण्याची तयारी ठेवा आणि जे कराल ते सर्वोत्तम करा. शेती करताना माती आणि पाणी परीक्षण या अत्यंत महत्वाच्या बाबी आहेत. जमिनीतील ऑरगॅनिक कार्बन आणि सिलिका हे घटक कमी होत असल्याने उत्पादकता कमी झालेली आहे. सिलिका हा अन्न निर्मितीतील प्रक्रियेत उत्प्रेरकाचे काम करते. त्याच बरोबर जमिनीची सच्छिद्रता वाढवली पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद हे माझे दैवत आहेत. रोज नवीन काही तरी शिकण्याचा आणि त्याचा उपयोग विकास कामात वापर करण्याचा प्रयत्न करतो. आपण जे करू ते गुणवत्ता पुर्णच असले पाहिजे. सातारा येथे शेतीमाल प्रक्रिया उद्योग व मेगा फूड पार्क सुरु झाला आहे. डाळींबाला शाश्‍वत दर मिळवून देण्यासाठी डाळींबापासून वाईन तयार करण्याचा प्रकल्प लवकरच सुरू होईल. कमी खर्चाची परिणामकारक औषधे, खते शेतकऱ्यांना पुरवून उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढीसाठी बिव्हिजी ग्रुप सहकार्य करीत आहे. हुमणी नियंत्रणासाठी रामबाण औषध आम्ही तयार केलेले आहे, असे ते म्हणाले.

घुले पाटील म्हणाले, स्वर्गीय घुले पाटील यांना अभिप्रेत असलेले समाजातील कष्टकरी घटकला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम हणमंतराव गायकवाड करीत आहेत. सर्व क्षेत्रातील प्रज्ञावंत व्यक्‍तिमत्वाला हा पुरस्कार आहे. कर्तृत्ववान माणसाला कार्यकर्तुत्वाला सीमा असूच शकत नाही ते त्यांनी दाखवून दिले.हुमणी नियंत्रनासाठी बिव्हिजिने पुढाकार घ्यावा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)