जिल्ह्यातील सर्व शाळांत ‘स्वच्छ भारत पंधरवडा’

संग्रहित फोटो

नेवासे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्‍टोबरपर्यंत स्वच्छ भारताचे स्वप्न बाळगले आहे. त्यांच्या अपेक्षेनुसार ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत जागृती व आचरण होण्याच्या हेतूने प्रत्येक शाळेत 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत “स्वछ भारत पंधरवडा’ या उपक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश शिक्षण खात्याने काढले आहेत.

स्वच्छता हे काम नसून ती एक चांगली सवय आहे. ही बाब विद्यार्थी व नागरिकांत रुजवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमात सर्व शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत शाळा व्यवस्थापन समितीने पालक-शिक्षक संघ यांच्या बैठका आयोजित करून शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांत स्वच्छतेचे महत्त्व जागृत करावे. स्वच्छतेसाठी त्यांना प्रेरणा द्यावी अशी सूचना करण्यात आली आहे. शिक्षकांनी शाळेतील स्वच्छता तपासून गरज असल्यास स्वच्छतेसाठी आवश्‍यक असणाऱ्या सुविधांची मागणी करण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे.

जिल्हा पंचायत समिती व गाव पातळीवर शौचालायासाठी स्पर्धा आयोजित करण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे. विद्यार्थी शिक्षक व पालकांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात यावी. स्वच्छतेच्या जागृतीची छायाचित्रे शाळास्तरावर प्रकाशित करण्यात यावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने या कालावधीत जुन्या अभिलेखाची नोंदणी करून गरज नसणाऱ्या लेखांची दप्तरी दाखल करणे, शाळा परिसरातील सर्व टाकाऊ साहित्य उदा. मोडके फर्निचर निरुपयोगी उपकरणे, नादुरुस्त वाहने शाळा परिसराततून काढण्यात यावीत. विद्यार्थी व शिक्षकांनी स्वच्छतेची जागृती गावात करावी. ओला, सुका कचरा वेगळा करून तो गोळा करण्यासाठी जागरुकता निर्माण करावी. यासाठी योजना आखण्यात यावी, आशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत स्वच्छता या विषयाचा समावेश विषय पत्रिकेत करण्यात यावा. उपक्रमाच्या कालावधीत रोज विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात यावी स्वच्छ भारत यावरील गीतांचे प्रसारण करण्यात यावे, स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी शाळा स्तरावर स्वच्छता राजदूत नियुक्‍त करण्यात यावेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तालुक्‍यातील शाळातील शिक्षकांची नेवासे पंचायत समितीमध्ये नुकतीच शिक्षक, विस्ताराधिकारी व केंद्रप्रमुखांची बैठक पार पडली. हा उपक्रम तालुक्‍यातील 100 टक्‍के शाळांत राबवला जात असल्याचे गटशिक्षणाधिकारी विलास साठे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)