राजीनामा मागे घेण्यासाठी सुखधानांना गळ

नेवासाफाटा : नेवासा नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक दोन मधील नगरसेविका शालिनीताई सुखधान यांनी नेवासा येथील प्रभाग क्रमांक दोन मधील नगरसेविका म्हणून राजीनामा देण्याची बुधवारी घोषणा केल्यानंतर शुक्रवारी या वार्डातील महिला व पुरुषांनी सुखधान यांच्या घरी जाऊन घेराओ घातला व राजीनामा द्याल तर तुमच्या घरासमोर उपोषण करु असा इशारा दिला व सुखधान दांपत्याला राजीनामा न देण्याची मागणी केली.

याबाबत नगरसेविका शालिनीताई सुखधान व संजय सुखधान यांना दिलेल्या निवेदनात या भागातील रहिवाशांनी म्हटले आहे की नगरसेविका शालिनीताई सुखधान यांनी आपले पती संजय सुखधान यांच्या समवेत नगरपंचायतच्या कारभाराचे भर चौकात वाभाडे काढून राजीनामा देण्याची घोषणा केली होती याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रभागातील सुमारे शंभर ते दीडशे महिला व पुरुष युवकांनी एकत्रित येऊन सुखधान यांचे निवासस्थान गाठले त्यांना घेरावो घालत आम्हाला व शहराला आपली गरज असून राजीनामा द्याल तर आम्ही तुमच्या घरासमोर उपोषण करू असा इशारा दिला.

या निवेदनात नागरिकांनी पुढे म्हटले आहे, 28 नोव्हेंबर रोजी आपण सोशल मीडिया व पत्रकारांसमोर राजीनामा देण्याची घोषणा केली त्याची कारणे ही आपण दिलेली आहेत, आम्हा जनतेचा आपल्यावर पूर्ण विश्वास असून त्याबद्दल अभिमान ही आहे. त्यावर राजीनामा देणे हा पर्याय नसून उलट आपल्यासारखे निस्वार्थी नगरसेवक की ज्यांनी आपल्या पदर खर्चातून करून प्रभागात हायमॅक्‍स लावणे, दुर्गम भागात मुरमाचे रस्ते तयार स्वखर्चातून घंटागाडीची सेवा दिली आहे, राजवाडा परिसरात इलेक्‍ट्रिक मोटारसह बोर मारून याठिकाणी स्वखर्चाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली आहे.

प्रभाग क्रमांक दोनमध्ये वृक्षारोपण करून सुशोभीकरण केले आहे. शालिनीताई सुखधान यांनी आपला राजीनामा न देता सत्तेत राहून इतर भ्रष्ट नगरसेवकांवर जरब बसवावा अशी कळकळीची विनंती निवेदनात केली आहे. आपण आपला निर्णय न बदलल्यास आम्ही आपल्या घरासमोर लाक्षणिक उपोषणाला बसू व जिल्हाधिकारी यांना भेटून आपली कैफियत मांडू असे म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)