अवैध दारूविक्री बंद करा

पोलीस प्रशासनाला निवेदन : नेवाशातील महिलांचा दांडा मोर्चाचा इशारा

नेवासे – शहरासह मध्यमेश्वरनगर (वार्ड नं. 4) येथे सुरू असलेली अवैध दारूविक्री त्वरित बंद करावी अन्यथा दांडा मोर्चा काढू असा इशारा देत महिलांनी नेवासा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांना निवेदन दिले.
या महिलांचे नेतृत्व नगराध्यक्षा संगिता बर्डे व नगरसेविका अनिता डोकडे यांनी केले. यावेळी महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या.

दारूमूळे आम्हाला नवऱ्यापासून मोठा त्रास होत असल्याने वेगळे राहण्याची वेळ आली आहे. तर काहींना दररोज नवऱ्याचा मार खाण्याची वेळ येत आहे. महिलांचे कौटुंबिक स्वास्थ बिघडत चालले आहे. दारू दुकानाच्या जवळील तळीरामांच्या उपद्रवामुळे या भागातील रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. येथे राहणेदेखील कठिण झाले आहे. अशा भावना महिलांनी यावेळी मांडल्या.

विशेष म्हणजे अवैद्य दारूविक्री ही मार्केट कमिटी समोर असलेल्या सुर्यमुखी हनुमान मंदिराजवळच असल्याने भाविकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवीगाळ करणे, मुलींची छेडछाड, मारामारी असे प्रकार ही या परिसरात वाढले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मध्यमेश्वरनगर येथील बाहेर व आतील भागात अवैधरित्या सुरू असलेल्या दारूविक्री करणाऱ्यांवर त्वरित कार्यवाही करावी व ही दुकाने कायमची बंद करण्यात यावी, अशी मागणी केली आहे .

नेवासा शहर व परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर एम.पी.डी. कायद्या अंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी कॉंग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष संजय सुखधान यांनी यावेळी बोलतांना केली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक डॉ.शरद गोर्डे यांनी महिलांच्या सर्व प्रतिक्रिया एकूण घेतल्या. मी तुमच्या पाठीशी असून दारू व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)