कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करा

पेन्शनर्स कल्याणकारी संघटनेची मागणी

नेवासाफाटा – सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी पेन्शनर्स कल्याणकारी संघटनेचे राज्याध्यक्ष सुभाष पोखरकर यांनी केली आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास राज्यात मोठे आंदोलन उभे करण्याचा इशाराही त्यांनी बैठकीदरम्यान दिला. नेवासा फाटा येथील विश्रामगृहामध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी ही मागणी केली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार बाळासाहेब देवखिळे हे होते.

-Ads-

यावेळी सुभाष पोखरकर म्हणाले, राज्यातील निमशासकीय कर्मचारी नोकरीवरून सेवानिवृत्त झाल्यानंतर शासन त्यांना तुटपुंजी रक्कम पेन्शनच्या स्वरूपात देते. ती रक्कम सेवा कालावधीत भविष्यनिर्वाह निधीच्या स्वरूपात प्रत्येक महिन्याला पगारातून कपात केलेली असते. पेन्शन पगाराच्या रकमेच्या तुलनेमध्ये देण्यात यावी अशीही मागणी पोखरकर यांनी केली.

यावेळी मेडीकल असोसिएशनचे रमेश सावंत, संघटनेचे उपाध्यक्ष संपत समिंदर, सरचिटणीस नारायण होन, दिलीप थोरात, अशोक पाथरकर, बापूराव बहिरट, ज्ञानेश्वर टेकाळे, नानासाहेब भागवत, अशोक देशमुख, उदय बल्लाळ, हुसेन बागवान, आशा शिंदे, प्रताप निकम, किसन निकम, सुभाष दाणी, किशोर शिंदे, रत्नाकर पागिरे, बाबासाहेब भगत, भाऊसाहेब टेमक, शिवाजी कंक, शंकर इरवे, विनायक लोळगे आदी उपस्थित होते.

पोखरकर पुढे म्हणाले, आमच्या मागण्या संदर्भात ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अन्य आमदारांना भेटून याबाबत विधिमंडळात आवाज उठविण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. यावेळी झालेल्या बैठकीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर टेकाळे यांनी केले तर, बापूराव बहिरट यांनी आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)