ऋषि पंचमीनिमित्त सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

नेवासाफाटा – प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नेवासा तालुक्‍यातील टोका येथील पुरातन श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये ऋषि पंचमीनिमित्त महिला भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभरात हजारो भाविकांनी गोदावरीत स्नान करून श्री सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी हर हर महादेवच्या गजराने परिसर दुमदुमला होता.

यावेळी सिद्धेश्वर मंदिराचे प्रमुख महंत 1008 बाल ब्रम्हचारी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने महिला भाविकांनी गोदावरीत स्नान करून गोदावरी मातेस साडी अर्पण करून ओटी भरली. मंदिरामध्ये महंत बालब्रह्मचारी महाराज यांच्या हस्ते दुग्धाभिषेक घालण्यात आला.

वेदशास्त्र संपन्न पुरोहित गंगापूर येथील आचार्य सोनूगुरू देवळे, किरण देवळे, नितीन धुमाळ, प्रवरासंगम येथील कांतागुरू जोशी यांनी भाविकांचे अभिषेक, पंचऋषि पूजन, अरुंधती पूजन करून धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य केले.

सर्वांना दर्शन घेता यावे यासाठी सिद्धेश्वर भक्त मंडळाचे रमेश गंगुले, शांतवन खंडागळे, संतोष मोरे, सुनील खंडागळे, किरण भालेराव, प्रविण चाबूकस्वार, विजय सुरासे, बापू मते, शाम उगले, आकाश काळे, विजय खंडागळे यांनी स्वयंसेवकाची भूमिका बजावली. उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसाद वाटण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)