नेवासेत अवैध दारू विक्री व जुगार अड्ड्यावर छापे

File Photo

नेवासे – नेवासे पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी धडक कारवाई करत तालुक्‍यातील नेवासा खुर्द, प्रवरासंगम, कुकाणा, भेंडा, सुलतानपुर, नेवासा बुद्रुक, शिरगाव या ठिकाणी अवैध दारू विक्री व जुगार अड्ड्यावर छापा टाकून सुमारे सोळा जणांवर कारवाई करत चार हजाराची दारू व जुगाऱ्याकडून साठ हजाराची रोकड जप्त केली.

नेवासे पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेपासून पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी अवैध धंद्याविरोधात जोरदार मोहीम उघडी आहे. अवैध दारू विक्रीप्रकरणी भाऊसाहेब लक्ष्मण शिरसाठ (रा. शिरसगाव ), अभय राजे, बापूसाहेब कचरे (रा.सुलतानपूर), विजय प्रकाश खंडागळे (रा.शिरसगाव ) यांचेकडून एकूण चार हजाराची देशी दारू व जुगार प्रकरणी तुकाराम लक्ष्मण वडागळे ( रा. नेवासा खुर्द), सुनील संपत डौले ( रा. पाचेगाव),अशोक गणपत साळवे ( रा. नेवासा बुद्रुक), शिवाजी मारुती सोडणर,पोपट लक्ष्मण राऊत, भाऊसाहेब जालिंदर मोरे, राजेंद्र कचरू शिंदे, नवनाथ महादेव आढागळे, राजेंद्र सुभाष शेलार, गणेश माणिक कोठारी (सर्व रा. प्रवरासंगम) शिवाजी अंबादास ओहोळ, चंद्रकांत नामदेव महापूर (रा.भेंडा), रामेश्वर लक्ष्मण सोनवणे (रा.कुकाणा) यांच्याकडून एकूण साठ हजाराची रोकड जप्त करण्यात आली.

या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांचे मार्गदर्शनखाली सपोनि भिंगारे, सपोनि वावळे, सपोनि माळी, पोलीस कर्मचारी विठ्ठल गायकवाड, खेडकर, सुहास गायकवाड, संभाजी गर्जे, बाळासाहेब नागरगोजे, साळवे, मोहडवे, कुकाणा दुरक्षेत्राचे प्रशांत भराट, बबन तमनर, अमोल बुचकूल यांनी कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)