ट्रकचालकांची लुटमार करणारी नेवाशातील टोळी पकडली

नगर – ट्रकला आडवे होऊन त्यांना पिस्तुलाची भीती दाखवित लुटमार करणारी नेवाशातील टोळी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे. या टोळीने जामखेड येथे ट्रकचालकाला लुटले होते. प्रदशन संदीपान पंत (वय 29, रा. गेवाराई) यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील आहे.

दीपक गणेश गुगळे (वय 19), अमोल आण्णासाहेब लोंढे (वय 26), शरद नारायण बरे (वय 21,), सौरभ शुभम चोरमले (वय 19, सर्व रा. माका, ता. नेवासे) व प्रशांत पंढरीनाथ खोसे (वय 22, रा. निंबे नांदूर, ता. शेवगाव) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीकडून चोरलेले दोन मोबाईल, एअरगनजप्त करण्यात आली आहे.

या टोळीने जामखेड येथे 10 सप्टेंबरला प्रदर्शन पंत यांच्या ट्रकला मोटारगाडी आडवी घालत त्यांच्याकडून 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लुटला होता. पोलिसांनी या टोळीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार जप्त केली आहे. पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या टिमने ही कारवाई केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)