न्यू आर्टस महाविद्यालयात ‘सर्जिकल स्ट्राइक’ गौरवदिन

नगर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निर्देशानुसार दि. 29 सप्टेंबर 2018 रोजी महाविद्यालयात सर्जिकल स्ट्राइक गौरव दिन साजरा करण्यातआला. यानिमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विंग व नॅशनल कॅडेट कोर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मुख्य चौकातून रॅलीचे आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे यांच्या हस्ते रॅलीचा प्रारंभ झाला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.ए.के.पंदरकर,उपप्राचार्य आर.जी.कोल्हे, महाविद्यालयाचे यशपाल सिंग, कॅप्टन पी.एम.भंडारी, सीटीओबी.एल.होळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा.भारती दानवे, प्रा.बी.एन.मुर्तडक, प्रा.गणेश निमसे आदि उपस्थित होते.

-Ads-

याप्रसंगी बोलतांना प्राचार्य झावरे म्हणाले,सर्व भारतीयांच्या रक्षणासाठी आपले जवान अहोरात्र सीमेवर शत्रूशी लढत असतात. त्यांच्या या कार्याचा आपण सर्वांनी गौरव केला पाहिजे. सीमेवरील जवान आपले घरदार सोडून देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात आहेत. शत्रूला आपल्या देशात घूसू न देता खडा पहारा देत आहेत. त्यामुळेच आज आपण देशात सुरक्षित आहोत. या जवानांप्रती आपलेही कर्तव्यआहे. त्यांनी बजावलेल्या कामगिरीचा आपणअभिमान बाळगला पाहिजे.

सर्जिकल स्ट्राईक हेत्यातीलच एक मोठे उदाहरण आहे. अशा शूरवीर जवानांना सलामच केला पाहिजे.
सर्जिकल स्ट्राईक गौरवार्थ विद्यार्थी व समाजामध्ये जाणिव जागृती व्हावी, या उद्देशाने विभागातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये उत्स्फुर्त सहभाग घेऊन भारतीय जवानांच्या कार्याच्या गौरवार्थ घोषणा दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)