कॉलेज तरुणाला खंडणी मागणाऱ्यास अटक

नेवासे पोलिसांची कामगिरी : सात दिवसांची पोलीस कोठडी

नेवासे – त्रिमूर्ती कॉलेजच्या तरुणास तीस हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी नेवासे फाटा अहल्यानगर परिसरातील शेखर दादासाहेब आहिरे यास नेवासे पोलिसांनी अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

या घटनेबाबत त्रिमूर्ती विद्यालय, मुकिंदपूरमधील एफवायबी कॉम या वर्गात शिक्षण घेणाऱ्या सिद्धार्थ राजेंद्र जाधव (वय 18 रा. सावतानगर, नेवासे फाटा) या कॉलेज तरुणाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, मी दि. 21 आगॅस्ट रोजी दुपारी तीन वाजता माझे मित्र सचिन क्षिरसागर, अशोक हजारे, सागर शिंदे, अनिकेत बोरुडे, सागर गायकवाड सावतानगर चारीजवळ गप्पा मारीत बसलो होतो. त्यावेळी शेखर दादासाहेब आहिरे (रा. अहल्यानगर) हा तेथे आला. तो म्हणाला की, तुझे मी फोटो काढले असून मला तीस हजार रुपये दे, जर तू मला पैसे दिले नाही तर मी तुझे फोटो सोशल मीडियावर टाकून तुझी बदनामी करेल, असे म्हणून खंडणीची मागणी केली.

तू जर माझे ऐकले नाही तर कुऱ्हाडीने तुझे हातपाय तोडेन असे म्हणून मला दमदाटी केली. माझ्या मित्रांनी त्यावेळी प्रकार मिटविला. त्यानंतर सर्व प्रकार घरी वडील राजेंद्र जाधव यांना सांगितला. त्याच्या भीतीने कॉलेज जाणे बंद झाले. त्याने तरीही चार पाच वेळेस खंडणीची मागणी केली. त्यानंतर वडिलांसह नेवासे पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचा निर्णय घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिली असल्याचे म्हटले आहे

या घटनेनंतर त्वरित कारवाई करत सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, विठ्ठल गायकवाड, संदीप दिवटे, बाळासाहेब नागरगोजे, नंदकुमार भैलुमे, अंबादास गीते, सुरेश शिंदे, राजेंद्र सुद्रुक यांनी आरोपीस तत्काळ अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)