बोंडअळीचे तिसऱ्या टप्प्यातील 10 कोटी 36 लाख वर्ग

File photo

आ. बाळासाहेब मुरकुटे : शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण

नेवासा फाटा – बोंडअळीच्या तिसऱ्या टप्प्यातील 10 कोटी 36 लाख रुपये अनुदान नेवासे तहसली कार्यालयाकडे जमा करण्यात आले असल्याची माहिती आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिली.

आमदार शिवाजीराव कर्डीले, आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तसेच पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे पाठपुरवठा केला. नगर जिल्ह्यात सर्वाधिक नेवासा तालुक्‍यासाठी 29 कोटी 26 लाख अनुदान मिळाले आहे. याआधी मागील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील 87 गावातील बोंडअळीचे एकूण 18 कोटी 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले होते.

मात्र उर्वरित शेवटच्या तिसऱ्या टप्प्यातील 40 गावच्या शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आमदार मुरकुटे यांच्या विशेष प्रयत्नाने हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार असल्याने शेतकऱ्यांमधे आनंदाचे वातावरण आहे.

तसेच 2016-17 साली पुरामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांसाठीही 61 लाख रुपये अनुदान मंजूर झालेले असून पूरग्रस्तांचे पैसेही लवकरात लवकर खात्यात जमा होणार आहे. एकूण 29 कोटी 26 लाख रुपये अनुदान नेवासा तालुक्‍यासाठी मिळाले आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)