राष्ट्रवादीकडे इच्छुकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नगर – महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांनी आज मुलाखतीवेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ढोल-ताशांच्या गजरात काहींनी मिरवणुका काढल्या. दुचाकी रॅली काढली. जथ्थेच्या जथ्थे मुलाखतीस्थळी दाखल होत होते. पुणे रोडवरील राष्ट्रवादी भवन गच्च भरले होते.

मुलाखतीवेळी इच्छुकांना एकही प्रश्‍न विचारण्यात आला नाही. इच्छुकांनी स्वतःची माहिती देत सामाजिक कामे सांगितले. आमदार अरुण जगताप, माजी आमदार दादा कळमकर, आमदार संग्राम जगताप, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते यांनी मुलाखती घेतल्या.

-Ads-

आमदार संग्राम जगताप यांनी मुलाखतीसाठी भरलेले राष्ट्रवादी भवन पाहून विरोधकांच्या गलिच्छ राजकारणावर जोरदार टिका केली. राष्ट्रवादीकडे इच्छुकांची गर्दी पाहता यावेळी बहुमताने महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. नगर शहरात कोणी गलिच्छ राजकारण हे नगरकरांना माहित आहे.

जनता जातीयवाद व गलिच्छ राजकारणाला वैतागली आहे, असा टोला त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता लगावला. सुमतीलाल कोठारी, अंबादास गारुडकर, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, शारदा लगड, रेश्‍मा आठरे, निर्मला मालपाणी आदी उपस्थित होते.

गणेश भोसले आणि डॉ. सागर बोरुडे राष्ट्रवादीकडे…

या मुलाखतींदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेता गणेश भोसले आणि शिवसेनेचे नगरसेवक डॉ. सागर बोरुडे हे देखील राष्ट्रवादी भवनात आले होते. गणेश भोसले यांनी राष्ट्रवादी अद्याप प्रवेश केलेला नाही. तरी देखील राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीकडून देखील त्यांना उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. शिवसेनेचे नगरसेवक डॉ. सागर बोरुडे हे देखील शक्तीप्रदर्शन करत आले होते. डॉ. बोरुडे हे काही काळ थांबले. आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केली आणि निघून गेले. डॉ. बोरुडे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्‍चित मानला जात असून, राष्ट्रवादीची अनुसूचित जाती प्रवर्गातून त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे संकेत आहेत. डॉ. बोरुडे हे शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक आहेत. ते मनपाच्या जुन्या प्रभाग चार (अ) मधून निवडून आलेले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
7 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)