पदे घेवून बसू नका, आपल्या भागातील प्रश्‍न सोडवा

चित्रा वाघ : विविध क्षेत्रातील 200 महिलांचा राष्ट्रवादीत प्रवेश : पवारांमुळे मिळाले महिलांना ५० टक्के आरक्षण

नगर – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष समाजामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून काम करणारा पक्ष आहे. महिलांनी पदे घेऊन बसू नका. तर आपल्या भागातील जनतेचे प्रश्‍न सोडवा. केंद्रातील व राज्यातील सरकारमुळे महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे महिलांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रेशनवरती गहू, तांदूळ, तेल, रॉकेल बंद केल्याने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. पेट्रोल, डिझेल व गॅस महागाईमुळे जनता त्रस्त आहे.नगर शहर हे राष्ट्रवादी महिलांचे मजबूत संघटन असलेले ठिकाण आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.

अ.नगर शहर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महिला मेळाव्याप्रसंगी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 200 महिलांनी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी आमदार संग्राम जगताप, शहर जिल्हाध्यक्षा रेश्‍माताई आठरे, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, जिल्हा महिलाध्यक्षा मंजुषा गुंड, निर्मला मालपाणी, मेधा कांबळे, शारदा लगड, अभिजीत खोसे, राजश्री मांढरे, नगरसेवक भारती भोसले, अंजली आव्हाड, कोमल रासकर, सागर गुंजाळ, हिना शेख आदी उपस्थित होते.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत 50 टक्के आरक्षण दिले. राज्यात महिला बचतगटाची चळवळ उभी केल्याने महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. रेश्‍मा आठरे यांचे नगर शहरामध्ये चांगलं काम करीत आहेत,असे चित्रा वाघ म्ह्यणाल्या

आ. संग्राम जगताप म्हणाले की, नगर शहरामध्ये महिलांची भूमिका मांडण्याचे काम राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष करतो. महिलांनी चूल व मूल इथपर्यंत मर्यादित न राहता त्यांना मुख्य प्रवाहात आणून काम करण्याची संधी दिली पाहिजे. मागील मनपा निवडणुकीत सर्वांत जास्त नगरसेवक निवडून आले होते. आता मनपावर बहुमत सिद्ध करून दाखविणार आहे. महिलांचे संघटन असल्याने महिलांनी आपापल्या भागातील प्रश्‍न आमच्याकडे सांगावेत ते सोडवू. बचतगटांच्या माध्यमातून महिलांसाठी जिल्हा बॅंकेमार्फत कर्जरूपी उद्योगधंद्यासाठी देण्याचे काम सुरू आहे, असे सांगितले.

रेश्‍मा आठरे म्हणाल्या की, नगर शहरातील महिलांच्या प्रश्‍नासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नेहमीच महिलांबरोबर उभा आहे. महिलांच्या विविध समस्या सोडविल्या. आ. संग्राम जगताप यांनी महिलांच्या विविध प्रश्‍नासाठी महिला आघाडीला नेहमीच मदत करीत आहेत. महिलांना राजकारणात सुरक्षित पक्ष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आहे. या पक्षात महिलांना मानाचे स्थान आहे.

मंजुषा गुंड म्हणाल्या की, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचारांनी होऊन विविध क्षेत्रात काम करणार्या महिलांनी आज प्रवेश केला आहे. त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल. पक्षाच्या माध्यमातून काम करणार्याला नेहमीच संधी दिली जाते, असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)