नगर महापालिका रणसंग्राम २०१८ : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 36 स्टार प्रचारक जाहीर

शरद पवारांचा समावेश नसल्याने त्यांच्या सभा होणार नाहीत

नगर – महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने तब्बल 36 स्टार प्रचारकांची यादी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी शनिवारी जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, खा. सुप्रिया सुळे, जिल्हा प्रभारी दिलीप वळसे यांचा समावेश आहे. या निवडणुकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश नसल्याने त्यांची एकही सभा होणार नसल्याचे स्पष्ट झाले.

महापालिका निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रतिष्ठेची केली असून सर्व सुत्र आमदार संग्राम जगताप यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत आहे.

या निवडणुकीसाठी पक्षाचे स्टार प्रचारक पुढीलप्रमाणे आहेत. अरुण गुजराथी, नवाब मलिक, फौजिया खान, अनिल देशमुख, छगन भुजबळ, आ. शशिकांत शिंदे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. मनोहर नाईक, आ. विद्या चव्हाण, गुलाबराव देवकर, शब्बीर विद्रोही, रवींद्र पाटील, अब्दुल मलिक, चित्रा वाघ, बापूसाहेब गोरठेकर, भास्करराव काळे, रमेश बंग, आ. ख्वाजा बेग, जयदेव गायकवाड, आ. समिश पाटील, चंद्रकांत ठाकरे, शंकर धोंडगे, बाबा गुजर, नानाभाऊ गाडबैल, वर्षा निकम, बाबाराव खडसे, संग्राम कोते, सक्षणा सलगर, संजय गरुड, अजिंक्‍यराणा पाटील व प्रदिप सोळुंके यांचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
180 :thumbsup:
49 :heart:
6 :joy:
0 :heart_eyes:
7 :blush:
1 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)