जनतेची दिशाभूल करणारे भाजपचे ‘जुमले’

File Photo

राष्ट्रवादीचे अजित पवार यांची टीका : नितीन गडकरी यांची कुबली हा पुरावा

भारनियमाविरोधात शुक्रवारी राज्यभर आंदोलन

सण-उत्सवाच्या तोंडावर सरकारला भारनियमन करण्याची वेळ आली आहे. सरकारचा हा नाकार्तेपणा उघडा पाडण्यासाठी राष्ट्रवादी शुक्रवारी (ता. 12) राज्यभर महावितरण कार्यालयात आंदोलन करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. महिला व युवक आघाडीला यासंदर्भात सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात परिस्थिती बिकट होत चालली आहे. आघाडी सरकारच्याकाळात राज्य भारनियमन मुक्त करण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. आताच्या सरकारकडे वीजेचा तुटवडा असून, तो भरून काढण्यासाठी नियोजन देखील नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

नगर – पोकळ घोषणा करत सत्ता मिळवली. त्यापैकी कशाहीची पूर्तता झाली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याची कबुली दिली. सर्वच पातळ्यांवर सरकार अपयशी ठरले आहे. जनतेचे बजेट कोलमडले आहे. निवडणुका जिंकण्याचा हाच नुकसात कार्यक्रम चालू आहे. “देर है, अंधेर नाही’, आगामी निवणडुकीत हे या सरकारला कळेल, अशा शब्दात त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा समाचार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी घेतला.

-Ads-

अजित पवार जिल्हा बॅंकेत आयोजित पत्रकार परिषदेतबोलत होते. पवार म्हणाले, “निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्ष फक्त घोषणाबाजी करते. मागील निवडणुकीत तेच केले. धनगर आरक्षण, दोन कोटी रोजगार, परदेशातून काळा पैसा आणणार, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करणार अशा अनेक घोषणांचा त्यात समावेश होता. यापैकी एकाचीही पूर्तता झाली नाही. ती करायचीच नव्हती.’ नितीन गडकरी यांनी हा निवडणुकीपुरता “जुमाला’ होता, याची कबुलीही दिली आहे. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून हे सरकार सत्तेत आले. आता पुन्हा मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पाहत आहेत. पण जनता तुम्ही दिलेल्या आश्‍वासने विसरलेली नाहीत, असा टोलाही पवार यांनी यावेळी लावला.

निवडणुकीच्या वेळी दिलेल्या पोकळ घोषणा आता उघड्या पडू लागल्या आहेत. यातून भाजप सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगून वाढती महागाई, बेरोजगारी यासह सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले आहे, असेही पवार म्हणाले. इंधन दरवाढ आवाक्‍याबाहेर जात आहे. परिणामी महागाई वाढत आहे. जनतेचे बजेट कोलमडले आहे, असेही त्यांनी सांगितले. निवडणुका जिंकण्याचा एवढा एकच कार्यक्रम भारतीय जनता पक्षाकडे राहिलेला आहे. फसव्या आणि पोकळ घोषणांच्या अपूर्तीवर होऊ घातलेल्या निवडणुका झाल्यावर त्यांचे काय मूल्य आहे, हे जनताचे दाखवेल, असाही टोला पवार यांनी यावेळी लगावला.

चव्हाण विखे पाटलांना खुश करत आहेत : पवार

नगर लोकसभेची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसचीच आहे. यावर कोणाचाही अधिकार नाही. जनसंघर्ष यात्रेत जिथे जाते, तिथे ही जागा घेऊ हे सांगण्यात त्यांचे नेते धन्यता मानतात. नगरची जागा राष्ट्रवादीच लढविणार असा स्पष्ट उल्लेख राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद केला. त्यांची राज्यभर जनसंघर्ष यात्रा सुरू आहे. यात्रेत आतापर्यंत या जागेसाठी 35 वेळा उल्लेख करत ही जागा आपल्याकडे घेऊ, असे त्यांचे नेते सांगत आहे. अंतिन निर्णय 12 तारखेला होईल. अजित पवार कधीच खोटे बोलत ना ही. जे मी सांगतो आहे, तेच होईल आणि तेच दिसेल, असेही ते म्हणाले. अशोक चव्हाण हे विखे पाटलांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत, असाही टोला अजित पवार यांनी लगावला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)