भाविकांना मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरास प्रारंभ

नगर – नवरात्र उत्सवानिमित्त बु-हानगरच्या देवीच्या दर्शनास जाणा-या भाविकांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर बार असोसिएशन व जगदंबा तुळजाभवानी देवी मंदिर ट्रस्ट बु-हाणनगर यांचे संयुक्त विद्यमाने मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.

शिबीराचे उदघाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पद्माकर केस्तीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. शेखर दरंदले पाटील, अँड.नरेश गुगळे, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अँड. गजेंद्र पिसाळ, सचिव अँड. प्रसाद गांगर्डे, सहसचिव अँड. सुनिल आठरे पाटील, खजिनदार अँड. राजेश कावरे, अँड. निता कांबळे, अँड. विजय भगत, अँड. अभिषेक भगत इ. उपस्थित होते.

या शिबिरामध्ये गरजु भाविकांना मोफत कायदेविषयक सल्ला देण्यात येणार आहे. दि.18 ऑक्‍टोबर विजयादशमी पर्यंत हे शिबीर चालू राहील. भाविकांनी या शीबिराचेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर व अहमदनगर बार असोसिएशन यांचे तर्फे करण्यात आले. या शिबिरासाठी देवस्थानचे पूजारी श्री.अर्जून भगत व भगत कुटूबियांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)